ताज्याघडामोडी

देश पुन्हा हादरला! ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने 22 हून अधिक रुग्णांचा तडफडून मृत्यू

आंध्रप्रदेश, 10 मे : आंध्रप्रदेशातील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद  झाल्याने तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानेही ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदात वर्तविण्यात येत आहे.

अतिदक्षता विभागात हे कोविड रुग्ण दाखल आहेत. दरम्यान ऑक्सिजन पुरवठा थांबताच राखीव ठेवण्यात आलेले ऑक्सिजन सिलेंडर लावण्याचा प्रयत्न झाला. त्या पाच मिनिटात श्वास घेता न आल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या अकरा रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावल फिरत आहे. दरम्यान श्रीपेरम्बदुर येथून ऑक्सिजनचा टॅकर मागवण्यात आला आहे.  रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली असून तणावाच वातावरण आहे.

ऑक्सिजन अभावी तडफडणाऱ्या रुग्णाना वाचवण्यासाठी नातेवाईकांनी केविलवाणे प्रयत्न केल्याचे चित्र पहायला मिळाले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago