बुलडाणा, 09 मे : राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशा परिस्थितीही पैशाच्या हव्यासापोटी काही जण काळाबाजार करत आहे. बुलडाण्यात चक्क रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाचा वॉर्ड बॉयच हा काळाबाजार करत होता.
बुलडाणा जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत असल्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने बुलडाणा गुन्हे शाखेच्या वतीने शहरात या इंजेक्शन्सची काळाबाजारी करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली होती. हे तिघे जण बुलडाणा शहरातील नामांकित डॉ. मेहेत्रे व डॉ लद्दड यांच्या हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय आहेत.
रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करत असताना पकडण्यात आलेल्या तीन जणांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 15 ते 20 हजार रुपयांमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री केली जात होती.
या हॉस्पिटलमध्ये वापरल्या गेलेले रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकत असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.त्यामुळे या पाण्याने भरलेल्या रेमडेसीवीरच्या कुप्या किती जणांना विकल्या व त्याचा किती रुग्णांवर वापर करण्यात आला आहे, हे ही तपासावं लागणार आहे. ह्या संपूर्ण किळसवाण्या प्रकारामुळे कोरोना काळात माणुसकी ओशाळली असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…