ताज्याघडामोडी

वांगणीतील 99 टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसात बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा दाखल

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर नजीक असलेल्या वांगणी येथे शिला क्लिनिक ह्या खाजगी दवाखान्याच्या डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता यांनी कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करत समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी होत होती. त्यांच्या उपचार पद्धतीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. हा सर्व प्रकार एबीपी माझाने प्रकाश झोतात आणला होता. अखेर या संपूर्ण प्रकाराची दखल आरोग्य विभागाने घेतलीय.

डॉ गुप्ता यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतीही परवानगी नसताना वांगणी येथे आपले क्लिनीक थाटले होते. तसेच कोरोना काळात कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेत नसल्याचा ठपका ठेवत अखेर ह्या डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अंबरनाथचे डॉ. सुनील बनसोडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

21 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago