ताज्याघडामोडी

पंढरपूर मध्ये नवीन 200 बेडचे कोविड केअर सेंटर

पंढरपूर मध्ये नवीन 200 बेडचे कोविड केअर सेंटर

 

                  पंढरपूर दि. 08 :  पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेदांत व व्हिडीओकॉन भक्त निवास मध्ये 200 बेडचे पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

                 यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे . संभाज शिंदे, साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे. भगीरथ भालके, प्रांताधिकारी सचिन ढोले. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी. तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, अमर पाटील उपस्थित होते.

             या कोविड केअर सेंटरमध्ये पंढरपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील तसेच परिसरातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराची  सुविधा उपलब्ध आहे . वेदांत भक्त निवास मध्ये जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूरच्या वतीने 100 बेड तर व्हिडिओकॉन भक्त निवास मध्ये डीव्हीपी उद्योगसमूहाचे श्री विठ्ठल-रूक्मिणी कोविड केअर सेंटरचे 100 बेड सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारांबरोबरच आयुर्वेदिक काढा, योगासने, मनोरंजनात्मक खेळ,  चहा,  नाष्टा. जेवण अल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा गरीब व गरजू रुग्णांना फायदा होणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे  पालन करावे. तसेच प्रशासनास सहकार्य करून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही श्री भरणे यांनी यावेळी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

22 mins ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago