गुन्हे विश्व

देशातील पहिलीच घटना : खून करणा-या अल्पवयीन आरोपीस बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सांगली | मिरज तालुक्यातल्या तुंग येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी नराधम अल्पवयीन 17 वर्षीय मुलास न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३६३, ३७६, ३७६ (अ), ३७६ (अ,ब), ३७७ (अ) तसेच पोक्सो कायदयांतर्गत कलम ४ व ६ खाली दोषी धरून प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे व प्रत्येक कलमान्वये १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ अन्वये दोषी धरून एक वर्षे साधा कारावास अशी बारा वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

डी. पी. सातवळेकर यांच्या समोर झाली. निर्भया हत्याकांडानंतर कायदयामध्ये करणेत आलेल्या दुरुस्तीनुसार भारतामध्ये झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. तुंग येथील अल्पवयीन मुलगी २० मे २०२० रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. तिचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच गावतील लोकांनी परीसरात तसेच शेतामध्ये रात्रभर शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील शोध घेणा-या लोकांना तिचे प्रेत हाळ भागात सापडले. तिच्या डोक्यात जखमा झालेल्या होत्या. तसेच तिचा पायजमा तिच्या गळयाभोवती गुंडाळलेला होता. सदर बाबतची फिर्याद मुलीच्या वडीलांनी ग्रामीण पोलस ठाण्यात तत्काळ दिली. पोलीसांनी कसून तपास केला असता सदरच्या मुलीस साक्षीदारांनी आरोपी सोबत खेळत असल्याचे पाहिले होते.

पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेवुन त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने पिडीत मुलीस उसाचे शेतात नेऊन व मोबाईलवरील अश्लील चित्रफित दाखवुन तिच्यावर अनैसर्गीकरित्या बलात्कार केला. त्यानंतर सदरची पीडीत मुलगी रडु लागल्याने आरोपीने तिला खाली पाडून तिचा हाताने गळा आवळला. त्यानंतर सुध्दा तिची हालचाल होत असल्याचे आरोपीच्या लक्षात आले व त्याने तिचा पायजमा गळ्याला अवळुन तिच्या मानेवर पाय ठेवून निर्दयीपणे खून करून पळून गेला. सदर केसची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांच्या न्यायालयात झाली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago