ताज्याघडामोडी

कोरोना काळात अधिकाऱ्यांची ओली पार्टी; ग्रामस्थांकडून व्हिडीओ चित्रण

लातूर : एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चाकूर नगरपंचायत येथील पाणी पुरवठा आणि स्वछता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोनाचे नियम मोडून सुरु असलेली मटन आणि दारु पार्टी गावकऱ्यांनी उघडकीस आणली आहे. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे.

अभियंता प्रमोद कास्टवाड, दिवाबत्ती कर्मचारी मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, नियंत्रण प्रमुख सचिन होलबे यांनी मटन आणि दारू पार्टी आयोजित केली होती.

चाकूर शहराच्या बाहेरील एक हॉटेलमध्ये ही पार्टी सुरु होती. याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. कोरोना काळात नगरपंचायत कर्मचारी हे सर्व निर्बंध पायदळी तुडवत आहेत याची खातरजमा करावी म्हणून गावकरी तेथे गेले. त्यावेळी हॉटेलच्या आतील रूममध्ये हे सर्व कर्मचारी दारू पित आणि मटन खाताना आढळून आले.

काही तरुण मुलांनी या पार्टीचा व्हिडीओ शूट केला. यावेळी तेथील कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली. काही वेळात हे व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ग्रामस्थानी या घटनेची लेखी तक्रार चाकूरचे तहसीदार शिवानंद बिडवे यांच्याकडे केली आहे. यातील दोषी लोकांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसील कार्यालयस प्राप्त झाले आहे.

चाकूर नगरपंचायतीचे मुख्यअधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याशी पत्र व्यवहार करून यातील सत्य काय आहे याची चौकशी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी, कर्मचारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago