ताज्याघडामोडी

मोदींची बदनामी करणाऱ्यांना संजय राऊतांनी खडसावले

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने कोरोना संकटाशी लढण्यासाठी मोदींनी पकड घेतली आहे, त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाबोत लढण्यासाठी धोरण आखले आहे, ते पाहता मद्रास उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील, असा मला विश्वास असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

भारताचा अपमान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे का असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, भारताचा अपमान हा राजकारणाचा विषय नाही. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान होत असेल, तर आपण सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या पंतप्रधानांसोबत उभे राहिले पाहिजे.

मोदी जी निती आखतील त्यासाठी आम्ही उभे राहू असा विश्वास मला द्यायचा आहे.

देशाचा नेता किंवा सरकार यांचा अपमान कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर होणे ठीक नाही. असे चित्र परदेशातील प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावर रंगवले जात असल्यामुळे देशातील व्यवहार, सामाजिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचे हे मोठे षडयंत्रही असू शकते, अशी शंका व्यक्त करताना आपण सर्वांनी एकत्रित लढले पाहिजे असे आवाहनही यावेळी संजय राऊत यांनी केले.

जी टिपण्णी मद्रास उच्च न्यायालयाने केली तेच आम्ही अनेक महिने सांगत आहोत. ममता बॅनर्जी, विरोधक सांगत होते. जेव्हा याच गोष्टी आम्ही सांगत होतो तेव्हा दिल्लीतील काही मोठे नेते आम्हाला ज्ञान देत होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

निवडणूक आणि कोरोनाचा काही संबंध नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणूक नाही तिथेही करोना झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. पण बंगाल, केरळ, तामिळनाडूत प्रचारासाठी भाजपने संपूर्ण देशातून लोक तिथे जमा केले. हे चुकीचे नाही, निवडणुकीत अशी रणनीती असते. पण देशात सध्या परिस्थिती ठीक नाही. जर काही लोक कुंभमध्ये गर्दी करत होते आणि कोरोनाचा फैलाव होतो म्हणून आक्षेप घेत असतील, तर पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये निवडणुकीमुळे अजून गर्दी होत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पण निवृत्त झालेल्या आयुक्तांना राज्यपाल म्हणून पाठवत राजकीयदृष्या रिटर्न गिफ्ट दिल्याचे कळत असल्याचे यावेळी संजय राऊतांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago