पंढरपूर तालुक्यातील डेअरी चालकाच्या तोंडात ऍसिड ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

रोपळे तालुका पंढरपूर येथील विश्वंभर सोपान कदम वय-57 वर्षे,धंदा-शेती व दुध डेअरी या चालकाने गावातील नितीन रघुनाथ कदम यास गावातून दूध संकलन करून डेअरीस देण्यासाठी दिलेल्या कमिशन पोटीच्या ऍडव्हान्सचे ४३ हजार पाचशे रुपये वारंवार चारचौघात मागतो म्हणून डेअरी चालक विश्वंभर कदम यास शिवीगाळ करत तु नेहमी चारचौघात मला पैसे मागुन माझी बेईज्जत करतो,माझी लोकांमध्ये आब्रु खातो,तुझे कसले पैसे मला माहीत नाहीत,थांब तुला जिवंतच ठेवत नाही.असे म्हणत दुधाचे फँट बघण्यासाठी असलेले अँसिडचे कँन्ड आणुन डेअरी चालकास खुर्चीवर दाबुन धरुन जिवे मारण्याच्या उद्देशाचे सदर अँसिडच्या कँन्डचे तोंड डेअरी चालकाच्या तोंडात घालुन जबरदस्ती अँसिड पाजले अशा आशयाची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी दाखल फिर्यादी नुसार,पंढरपूर तालुक्यातील रोपळे येतील विश्वभंर कदम हे सह्याद्री डेअरी बारामती यांच्याशी भागीरदारीत रोपळे येथे डेअरी व्यवसाय करतात.भावकीतीलच नितीन रघुनाथ कदम हा गावातील शेतक-यांकडुन दुध गोळा करुन गोळा केलेले दूध या डेअरीस देत असे.फिर्यादीने सदर नितीन कदम यास दूध गोळा कारणेसाठीच्या ऍडव्हान्स पोटी ६५ हजार इतकी उचल दिली होती.त्या पैकी २१ हजार ५०० रुपये कमिशन पोटी वजा करता राहिलेले ४३ हजार ५०० रुपये फिर्यादी हे नितीन कदम याकडे वारंवार व चारचौघात मागणी करीत होते.या वादातूनच हा हल्ला करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी नितीन कदम याच्या विरोधात भादंवि ३०७,४५२,५०४,५०६ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago