ताज्याघडामोडी

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज  निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

 निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती

     

                   पंढरपूर, दि. 15 :  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी सात ते  सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक  निर्भय , नि:पक्ष  आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी  प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

              पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 1 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार  व 1 लाख 62 हजार 694 स्त्री मतदार तसेच इतर 5 असे एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. मतदारसंघात 524 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र 196 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट व 524 व्हीहीपॅट मशीन असणार आहेत. तसेच 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  निवडणुकीसाठी  2552  अधिकारी – कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी 94 एसटी बसेस व तीन जीपची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

               मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा बीज पुरवठा, शौचालय,  दिव्यांगासाठी रॅमची सुविधा करण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली  आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago