ताज्याघडामोडी

कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह  दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी

कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह  दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी

 पंढरपूर, दि. ११ :- पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी  कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांना  टपालाव्दारे मतदान करता यावे, यासाठी  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पंढरपूर विधानसभा मतदार संघात दिनांक 13 व 14 एप्रिल 2021 रोजी  क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फत  टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांना  मतदान करता यावे यासाठी 48 क्षेत्रिय अधिकारी तसेच सहायकांची नेमणूक केली आहे. संबधित अधिकाऱ्यांनी मतदार यादीतील  पत्त्यावर जावून टपाल मत पत्रिकेव्दारे मतदान नोंदवून त्याच दिवशी अहवाल सादर करणार आहेत. ज्या मतदारांचे उपरोक्त दिनांकास भेट झाली नसल्यास त्यांना 15 एप्रिल 2021 रोजी मतदान करता येणार असल्याचे श्री बेल्हेकर यांनी सांगितले आहे.

टपाली मतदान नोंदणीसाठी  दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी   कौठाळी, इसबावी ,वाखरी गादेगांव, कोर्टी, बोहाळी, उंबरगांव, टाकळी, पंढरपूर, मुंढेवाडी, कासेगांव, खर्डी, शेटफळ, तनाळी, तावशी, चिचुंबे, सिध्देवाडी, अनवली, रांझणी, ममदाबाद शे., गुजगांव, मल्लेवाडी, धर्मगांव, उचेठाण, बठाण,मंगळवेढा, अकोले, शेलेवाडी, आंधळगांव, कचरेवाडी, मुढेवाडी, माचनुर, तामदर्डी, तांडोरा, सिध्दापूर, फटेवाडी, खोमनाळी, हिवरगांव, डोंगरगांव, , पाटकळ, लेंढवे चिचांळे, शिरसी, गोणेवाडी,  हाजापूर, भाळवणी, तळसंगी, मरवडे, लमाणतांडा, हुलजंती येड्राव, जलीहाळ, नंदेश्वर, भोसे, रड्डे, चिकलगी, बावची, येळगी, सोड्डी, लवंगी, मारोळी, रवेवाडी, ममदाबाद हु.या गावांतील भागामध्ये टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान नोंदणी करणार आहेत.

 दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी कौठाळी, शिरढोण, इसबावी, वाखरी , गादेगांव, कोर्टी, बोहाळी, उंबरगांव, टाकळी, पंढरपूर,गोपाळपूर, कासेगांव, खर्डी, शेटफळ, तनाळी, तावशी, एकलासपूर, अनवली, शिरगांव, तरटगांव, कासेगांव, गुंजेगांव, मारापूर, घरनिकी, ब्रम्हपूरी,मंगळवेढा, लक्ष्मीदहीवडी , आंधळगांव, कचरेवाडी, रहाटेवाडी, आरळी, नंदुर, डोणज, भालेवाडी, डोंगरगांव,पाटखळ, गणेशवाडी, लेढवेचिचाळे, खुपसंगी, जुनोनी, मेटकलवाडी, तळसंगी, डिकसळ, कात्राळ,खवे, जिंती, निंबोणी, सिध्दनकेरी, खडकी, नंदेश्वर, भोसे, रड्डे, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु, सलगर बु., शिरनांदगी, हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी या गावांतील भागामध्ये टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान नोंदणी करण्यात येणार असल्याचे श्री.बेल्हेकर यांनी सांगितले.

संबधित नियुक्त अधिकाऱ्यांनी मतदारांनी दिलेल्या पत्त्यावर भेट घ्यावी. संबधितांना पोस्टल मतपत्रिका देण्यापुर्वी मतदारांची ओळख पटविण्यात यावी. आवश्यक पुरावे नोदवावेत. सर्व पक्रिया मतदाराला समाजावून सांगावी, मतदार अंध अथवा शाररिक दृष्ट्या मतदान करण्यास असमर्थ असल्यास कुटुबांतील वयस्कर व्यक्ती मतदान करण्यास मदत  घेवू शकतो. एकच सोबती एकापेक्षा जास्त मतदानाकरिता मदत करु शकणार नाही. मतदाराने मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावांसमोर खुण अथवा शिक्का मारुन पसंतीचे मत नोदविण्यात येवू शकते.  या पथकास मदत करण्यासाठी पोलीस बंदोबस्त व व्हिडीओग्राफरची मदत नियुक्ती करण्यात आली असल्याचेही सहायक निवडणूक अधिकारी बेल्हेकर यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago