ताज्याघडामोडी

उमेश परिचारकांचा पंढरपुरात प्रभागनिहाय बैठकांचा धडाका 

२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आता सर्वच प्रमुख पक्षांच्या  उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून आमदार प्रशांत परिचारक हे संपूर्ण मतदार सर्वत्र सभा,पदयात्रा,प्रचार बैठकांच्या माध्यमातून पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ग्राउंड वर्क करत असतानाच युटोपियन शुगरचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे पंढरपूर शहारत विविध प्रभागात  समर्थक नगरसेवक,प्रभागातील कार्यकर्ते यांच्या समवेत बैठका घेत आहेत.प्रचार ते प्रत्यक्ष मतदान यामधील प्रत्येक टप्प्याचे या बैठकांमधून नियोजन केले जात असून प्रत्येक मत हे महत्वपूर्ण मानून कार्यकर्त्यांनी तळमळीने काम करत पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा उमेश परिचारक हे या बैठकीत व्यक्त करताना दिसून येत आहेत.       

पंढरपूर शहर तालुकाच्या राजकारणात परिचारकांचा पक्ष कुठला हे महत्वाचे न मानता निष्ठा राखत काम करणारा कार्यकर्ता वर्ग मोठा आहे.पांडुरंग परिवाराचे आर्थिक दृष्टया सक्षम संस्थांचे जाळे आणि यामुळे निर्माण झालेला लोकसंग्रह हे परिचारकांचे बलस्थान आहे. त्यामुळेच सत्ता असो अथवा नसो परिचारकांचा कार्यकर्ता कधी फुटत नाही अशी चर्चा कायम राजकीय वर्तुळात होत आली आहे.यावेळी भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्याने परिचारक सर्मथक पूर्ण झोकून देऊन प्रचार करणार का अशी शंका व्यक्त केली जात होती मात्र उमेश परिचारक यांनी मतदान केंद्रनिहाय नियोजनाची सूत्रे आपल्या हाती घेत शहर आणि २२ गावात बैठकांचा धडाका लावला असून समाधान आवताडे यांना ज्या प्रभागातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल तेथील परिचारक समर्थक कार्यकर्त्यांची पुढील राजकीय अधिक दखलपात्र होणार आहे.       

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

13 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago