ताज्याघडामोडी

पंढरपूरात  निर्माण करणार अतिरिक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल

पंढरपूरात  निर्माण करणार अतिरिक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल

 

                  पंढरपूर दि. 10: कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पंढरपूरात विविध चार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिरिक्त एकूण १२० बेडची क्षमता निर्माण करण्यासाठी वैद्कीय अधिक्षकांनी आवश्यकती कार्यवाही करावी  अशा, सूचना  उपजिल्हाधिकारी  सचिन ढोले यांनी दिल्या.

                 तालुक्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी ढोले यांनी पंढरपूर नगरपरिषदेत शहरातील खाजगी डॉक्टर व ऑक्सिजन पुरवठाधारक यांची बैठक घेतली.

                  बैठकीस मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरपालिकेचे डॉ बी. के. धोत्रे, डॉक्टर संभाजी भोसले, गणपती हॉस्पिटल डॉ कारंडे, गॅलक्सी हॉस्पिटल डॉ. गुजरे, डॉ सुरज पाचकवडे,ॲपेक्स हॉस्पिटल डॉ. आरिफ बोहरी लाईफ लाईन डॉक्टर  संजय देशमुख  उपस्थित होते.

                 श्री.  ढोले म्हणाले, रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडीतपणे सुरु राहील तसेच रुग्णांलयात वेळेत ऑक्सिजन प्राप्त होईल याची दक्षता ऑक्सिजन पुरवठादाराने घ्यावी. यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात रहावे.कोविड केअर सेंटर येथील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता वैद्यकीय सुविधेसाठी निमा संघटनेतील डॉक्टरांची मदत घेवून होम असोलेशनची सुविधा निर्माण करावी. होम असोलेशनमध्ये असलेले नागरिक बाहेर फिरणार नाहीत यांची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.  तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खाजगी व शासकीय वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, प्रशासन यांनी एकात्मिक प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

                   अतिरिक्त 120 बेडच्या क्षमता असलेले  नवीन चार डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी वैद्यकीय अधिक्षकांनी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया करुन कार्यवाही करावी. लाईफ लाईन हॉस्पिटलने पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या उपचारासाठी  डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल तात्काळ कार्यान्वित करावे. शहरातील लॅब धारकांनी  रॅपिड ॲटिजेन तपासणी व आरटीपीसार तपासणीचे दर शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमानुसार घ्यावेत. त्याबाबत दर पत्रक दर्शनी भागावर लावावे. डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलचे  फायर ऑडीट व इलेक्ट्रीसिटी ऑडिट संबधित रुग्णालयांनी करुन घ्यावे. याबाबत रुग्णालयांची तपासणी नगर पालिका प्रशासनाने करुन घ्यावी अशा सूचनाही श्री.ढोले यांनी यावेळी दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago