ताज्याघडामोडी

कोणाचेतरी कपडे घालून,  कुणासारखं दिसलो म्हणून आमदार होता येत नाही –  आ.प्रशांत परिचारक

कोणाचेतरी कपडे घालून,  कुणासारखं दिसलो म्हणून आमदार होता येत नाही –.   आ.प्रशांत परिचारक
  मंगळवेढा – पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा झाली.  रांझणी या गावात विराट अशा सभेत आमदार प्रशांत परिचारक यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ही निवडणूक विचारांची आहे विरोधक भारत भालके विरोधातील निवडणूक असल्याचा बनाव आणत आहेत मात्र राज्यातील भ्रष्ट सरकार विरुद्ध सामान्य जनता अशी निवडणूक आहे. राजकारणात मीही भावनेवर राजकारण केले असते मात्र मोठ्या मालकांनी सुरू केलेले कारखाने, संस्था या मोठया करायच्या आहेत हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
ही निवडणूक शेतकऱ्यांच्या आक्रोशाची आहे, ३५ गावांना पाणी देतो म्हणून भूलथापा मारल्या, फक्त कागदी घोडे नाचवले, विठ्ठल कारखान्याचे वाटोळे केले, कामगारांना वाऱ्यावर सोडले,  आता वारसा सांगून मते मागत आहेत पण मते मिळवण्यासाठी काम करावं लागतं. कुणाची तरी कपडे घातली, कुणासारखं दिसलो म्हणून आमदार होता येत नाही अशी टीका परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भागिरथ भालके यांच्यावर केली.
आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा निरीक्षक माजी मंत्री बाळासाहेब भेगडे,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,.  माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख,डॉ बी पी रोंगे, रयत क्रांतीचे दीपक भोसले, शशिकांत चव्हाण, झेडपी सदस्य वसंतराव देशमुख, प्रणव परिचारक, प्रशांत देशमुख, सुनील सर्वगोड, माऊली हळणवर, दिनकर मोरे, अर्चना व्हरगर, सुरेश आगवणे, बाळासाहेब देशमुख, दिलीप घाडगे, हरीश गायकवाड, सुभाष मस्के, भास्कर कसगावडे, भारत मोरे , हरिभाऊ गावंदरे, संतोष देशमुख तुकाराम कुरे ,दादा मोटे, हरिभाऊ फुकारे ,सिताराम भुसे यांच्यासह गावातील सरपंच उपसरपंच विविध संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी विकास संस्थेचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य भाजपचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात समाधान आवताडे म्हणाले, विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन वेळ घालवण्यापेक्षा गेली अकरा वर्षे मतदार संघ विकासा विना मागे का राहिला का याचा विचार करणे गरजेचे आहे मला मंगळवेढ्याने स्वीकारले आहे मात्र आता पंढरपुरात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा आशीर्वाद आणि आमदार प्रशांत परिचारक यांची साथ यामुळे हत्तीचे बळ आले आहे, ही निवडणूक विकासाची निवडणूक असून कोणत्याही संस्था बुडवायच्या नाहीत त्या कशा चांगल्या चालतील हे पाहणार आहे.आपल्या भाषणात समाधान आवताडे म्हणाले, विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन वेळ घालवण्यापेक्षा गेली अकरा वर्षे मतदार संघ विकासा विना मागे का राहिला का याचा विचार करणे गरजेचे आहे मला मंगळवेढ्याने स्वीकारले आहे मात्र आता पंढरपुरात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा आशीर्वाद आणि आमदार प्रशांत परिचारक यांची साथ यामुळे हत्तीचे बळ आले आहे, ही निवडणूक विकासाची निवडणूक असून कोणत्याही संस्था बुडवायच्या नाहीत त्या कशा चांगल्या चालतील हे पाहणार आहे.मला कुठला भ्रष्टाचार करायचा नाही, संस्था बुडवायच्या नाहीत आहे त्या टिकवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या आहेत त्यामुळे पायात-पाय न घालता हातात हात घालून पंढरपूर-मंगळवेढ्याचा विकास करू अशी ग्वाही भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी दिली.
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.समाधान महादेव आवताडे यांचे प्रचार शुभारंभ ग्रामदैवत श्री.महादेव मंदिर,रांजणी येथुन जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारी,माजी राज्यमंत्री बाळाजी भेगडे,विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विधान परिषद आमदार मा.श्री.प्रशांत परिचारक,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,  माजी सहकार मंत्री मा.सुभाष देशमुख, पंढरपूर मिस्टर नगराध्यक्ष नागेश भोसले,उपसभापती राजश्री पंडितराव भोसले, रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे ,जिल्हा परिषद सदस्य,पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री.वसंतनाना देशमुख, भाजप नेते मा.श्री.बी.पी.रोंगे सर,मा.श्री.दत्तात्रय जमदाडे,युवा नेते मा.श्री.प्रणवमालक परिचारक,शेतकरी संघटना अध्यक्ष मा.श्री.माऊली हळणवर,माजी उपसभापती मा.श्री.प्रशांत देशमुख,मा.श्री.सुनील सर्वगोड,पांडुरंग संचालक मा.श्री.सुरेश आगवणे,पंचायत समिती सदस्य मा.श्री.अरुण घोलप,मा.श्री.बाळासो देशमुख,मा.श्री.दिनकर मोरे,संचालक मा.श्री.हरिषदादा गायकवाड, मा.श्री.सुभाष मस्के, मा.श्री.भास्करराव कसगावडे, मा.श्री.भारत मोरे,मा.श्री. हरिभाऊ गावांधरे,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.बाळासो देशमुख,मा.श्री.संतोष देशमुख,मा.श्री.तुकाराम कुरे,मा.श्री.हरिभाऊ फुगारे,मा.श्री. सिताराम भुसे,मा.श्री.दादा मोटे,सूत्रसंचालन दिगंबर यादव,अशोक उन्हाळे यांची उपस्थितीत करण्यात आला
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago