ताज्याघडामोडी

कल्याणराव काळे यांचा गुरूवारी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश

पंढरपूर प्रतिनिधी दि.06- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी अखेर भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पालकमंत्री दत्तात्रय भरणे,उमेदवार भगिरथ भालके यांचे उपस्थितीमध्ये गुरुवार दि.08 एप्रिल रोजी सकाळी 09 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुक जाहीर झालेनंतर राजकीय वर्तुळामध्ये कल्याणराव काळे यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन वर्षापुर्वी त्यांनी आपल्या कारखानदारीच्या अडचणी सोडविण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. विट्ठल परिवारातील घटक असलेल्या श्री विट्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.भारत भालके यांच्या निधनानंतर भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर     झाली काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा असा कार्यकत्र्यांमधुन रेटा वाढत होता तर दुसरीकडे भाजपा मधील वरिष्ठ नेते त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून मनधरणी करीत होते. मागील आठवडाभरातील चर्चेनंतर काळे यांनी अजितदादा पवार यांचेशी चर्चा करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर येथील कोर्टी रोडवरील श्रीयश प्ॉलेस येथे पक्ष प्रवेश होणार असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago