ताज्याघडामोडी

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करा निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांच्या सूचना

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करा

निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांच्या सूचना

 

            पंढरपूर. 03:-  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांनी आज येथे बैठकीत दिल्या.

                  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या तयारीचा श्री.गिरी यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ह्या सूचना दिल्या. पंढरपूर उपविभागीय कार्यालयाच्या झालेल्या परिसरात झालेल्या या बैठकीस व्यासपीठावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतूल झेंडे, भाउपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.

                  बैठकीस सुरवातीस श्री.गिरी यांनी नोडल अधिकारी यांनी केलेल्या तयारीची माहिती घेतली. विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकारी यांनी आतापर्यंत केलेले काम आणि निवडणूक प्रक्रियेत केले जाणारे काम यांची माहिती दिली. समन्वय अधिकारीयांनी त्यांना नेमून दिलेल्या कामाबाबत नियोजन करावे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे आणि त्याचबरोबर कोरोना विषयक सूचनांचे काटेकोर पालन करा, अशा सूचना निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी यांनी दिल्या.

                  सूक्ष्म निरीक्षकांनी चेकलिस्ट नूसार काम करावे.ईव्हीएम आणि मनुष्यबळ व्यवस्थापन याबाबत नियोजन करा. क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना विषयक सूचना आणि नियमांचे पालन करावे. त्यासाठी सार्वजनी आरोग्य विभागाने पुरेशी तयारी करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

        विधानसभा पोट निवडणुकीसाठी सर्व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या. यावेळी बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव,  उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे यांच्यासह पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी नियुक्त जिल्हास्तरीय सर्व नोडल अधिकार तसेच सर्व  क्षेत्रीय अधिकारी सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago