ताज्याघडामोडी

राज्यात कडक निर्बंध लादण्याचा मुख्यमंत्र्यानी दिला इशारा

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

मुख्यमंत्र्यांचे बोलण्यातील महत्वाचे मुद्दे :

 

    • घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे, घाबरू नका : मुख्यमंत्री

 

    • राज्यातील परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी मी संवाद साधत आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन आता वर्ष पूर्ण झालं आहे. मधल्या काळात या विषाणूला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो.

 

    • कोरणाणामुळे जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे.

 

    • लोकडाऊन करण्याची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही.

 

    • लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्यानं कोरोना वाढला.

 

    • अडीच लाख चाचण्या राज्यात रोज करणार, केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या होणार. 70 टक्के आर्टीपीसीआर चाचण्या करणार.

 

    • लॉकडाऊन होणार का? याचं उत्तर मी आता देत नाही.

 

    • पाचशे चाचण्यांची सेंटर उभारली आहेत, 50 हजार चाचण्या दर दिवसाला करत आहे.

 

    • महाराष्ट्रात 75 हजार चाचण्या करण्याची क्षमता 1 लाख 82 हजार एवढी झाली आहे. पण त्याहीपेक्षा अडीच लाख क्षमता करायची आहे.

 

    • काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही, सत्य काय आहे ते जनतेसमोर ठेवत आहे.

 

    • मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे मला विलन जरी ठरवलं तरी मला चालेल. गेल्या वर्षी परिस्थिती गंभीर होती बेड्स अब्युलन्स मिळत नव्हती.

 

    • लस घेतल्यावरही काहीजण कोरोनाबधित होत आहेत. लस घेतल्यावरही काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क वापरणे आवश्यक आहे. लस घेतल्यावरही कोरोना होणार मात्र त्याची तीव्रता कमी असेल.

 

    • रुग्ण वाढ झपाट्यानं होतं आहे. एकट्या मुंबईत 8 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहे.

 

    • आज 46 हजारपर्यंत संख्या वाढत चाललेली आहे. सुविधा आपण आवश्यकतेनुसार वाढवत चाललो आहे. बेड्स व्हेटिंलेटर, ऑक्सिजन जरी वाढले तरी डॉक्टर कसे वाढणार? आरोग्य सेवकांना कोरोनानं ग्रासले आहेत.

 

    • अनेक साईड इफेक्ट दिसून येतात. आरोग्य सेवक निगेटिव्ह आल्यानंतर लगेच ते आपल्या सेवेत येत आहेत.

 

    • टेस्टींग वाढवत आहेत, बोलणारे बोलतात लसीकरण वाढवले पाहिजे असं केलं पाहिजे. लसीकरणात एका दिवसात 3 लाख नागरिकांना लस दिलेली आहे.

 

  • 65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago