समाधान आवताडेंच्या विजयासाठी आ.प्रशांत परिचारक यांच्या मॅरेथॉन बैठकांना पंढरपुरात सुरुवात

२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजापाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज पंढरपूर शहरातील भाजपचे काही पदाधीकारी,नगरसेवक यांच्यासह शहरातील विविध भागातील आपल्या समर्थकांना या निवडणुकीसाठी अलर्ट मोडवर राहून कुठलाही हलगर्जीपणा न करता व गेल्या पाच -सहा वर्षाच्या कालावधीत आमदार प्रशांतराव परिचारक यांनी महायुतीच्या सत्ताकाळात शहरासाठी मंजूर करून आणलेल्या निधीची,पूर्ण करण्यात आलेय,प्रगतीपथावर असलेल्या तसेच लवकरच हाती घेण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा,प्रत्येक मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधा आणि त्यांना आपली भूमिका पटवून द्या,मागील निवडणुकीत आपण शहरातील काही बुथवर मागे राहिलो त्याची कारणे जाणून घेत समस्या ऐकून त्याना आश्वस्त करा,पक्षाने आपल्यावर मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकली आहे आपण ती तितक्याच जबाबदारीने पार पाडली पाहिजे अशा सुचना नगरसेवक,विविध पदाधिकारी,जेष्ठ समर्थक यांना देत असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.           

 आज आमदार प्रशांत परिचारक यांनी शहरातील इसबावी या सर्वात मोठ्या उपनगरात माजी नगरसेवक गणेश अधटराव,नगरसेवक विशाल मलपे, सचिन शिंदे, इरफान मुजावर, सुनिल ढोले,उमेश जाधव,नागेश सूर्यवंशी, नितीन घंटे, शशिकांत म्हत्रे, निखिल सूर्यवंशी, भागवत कुंभार, विकी अभंगराव, प्रकाश मगर,किरण खडाखडे ,वैभव परचंडे, महेश कुलकर्णी,यांच्यासह या भागातील अनेक प्रमुख परिचारक सर्मथक पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्त्याची बैठक घेऊन या भागातून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी या परिसरातील मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क आणि संवाद साधत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago