दीप्ती काळे या महिलेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 8व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती काळे ही महिला मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी होती. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दीप्ती काळे हिच्यावर पुण्यातील नामवंत सराफासह अनेक नागरिकांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच खंडणीचाही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीप्ती काळेवर […]
ताज्याघडामोडी
मोदींची बदनामी करणाऱ्यांना संजय राऊतांनी खडसावले
नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने कोरोना संकटाशी लढण्यासाठी मोदींनी पकड घेतली आहे, त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाबोत लढण्यासाठी धोरण आखले आहे, ते पाहता मद्रास उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील, असा मला विश्वास असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. […]
पंढरपूरात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
वाळू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची पोलीस कोठडी वाढविण्यात येऊ नये यासाठी अटकेतील आरोपी च्या भावाकडे विशाल काटे नामक इसमाने माझे पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, तुमच्या भावास पोलीस कोठडी वाढवून मागणार नाही असे सांगत चार लाखाची लाचेची मागणी करणाऱ्या व त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दोन लाख पैकी 70 हजार रुपये स्वीकारून स्विफ्ट गाडीतून पळ काढणाऱ्या विशाल […]
ना रेमडेसिवीर ना व्हेंटिलेटर तरीही वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात
विंचूर : कोरोनाची बाधा झाल्यावर अऩेकजणांची भीतीने तारांबळ उडते. मात्र, मानसिक स्वास्थाच्या बळावर अनेकजण कोरोनामुक्त झाल्याची उदाहरणे ताजी असतानाच निफाड तालुक्यातील चांगदेवराव शिंदे (७२) व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे (६६) या शेतकरी दाम्पत्याने चौदा व सोळा स्कोअर पातळी असताना घरच्या घरी उपचार करून कोरोना आजाराने खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे. निफाड […]
कोरोनामुळे भाजप नगरसेविकेच्या भावाचे निधन, बहिणीने हॉस्पिटलमध्ये केली तोडफोड!
नाशिक, 27 एप्रिल : नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यसह राजकीय लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. नाशिकमध्ये सर्वात तरुण नगरसेविका ओळख असलेल्या प्रियंका घाटे यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला. भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे […]
खळबळजनक! प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाची हत्या केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक
हुबळी, 27 एप्रिल: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला हुबळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. 32 वर्षीय राकेश काटवेच्या खून प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. मीडिया अहवालानुसार राकेशचं डोकं धडावेगळं करण्यात आलं होतं, देवरगुडीहल वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत त्याचं डोकं आढळलं तर शरीराचा इतर […]
1 मेपासून होणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह
मुंबई : येत्या 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही 1 मे पासून व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता या लसीकरणाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभारण्याची शक्यता आहे. कारण राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लसीच उपलब्ध झाल्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात उपलब्ध असलेल्या तिन्ही लसी या मे […]
कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांवर दाखल होणार गुन्हे
नाशिक, 27 एप्रिल: राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहारांभोवती कोरोनाची विळखा अधिक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी […]
राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. […]
ऑक्सिजन प्लांटसाठी केंद्राकडून राज्याला एक पैसाही नाही; काँग्रेसची टीका
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण येत आहे. याशिवाय आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून महाराष्ट्राला निधी दिला जात नाही. त्यावरून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘पीएम केअर फंडामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणताही निधी […]