ताज्याघडामोडी

वीजबिल माफीवरून आंदोलन चिघळलं; अधिक्षकाला खुर्चीला बांधणाऱ्या भाजप आमदाराला अटक

जळगाव, 26 मार्च: सध्या राज्यात वीजबिल (Electricity Bill) माफीवरून चांगलचं वातावरण पेटलं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या (Corona Lockdown) काळात अनेक वीज ग्राहकांना वाढीव वीजबिलं पाठवण्यात आली होती. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली होती. त्यामुळे राज्यात वीजबिल माफीची मागणी जोर धरू लागली होती. अशातच महावितरणाने थकबाकी असणाऱ्या ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. तसेच अनेकांचा वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं (Protest) केली आहेत.

शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीवरून भाजपचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील भाजप आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavhan) यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. चाळीसगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील वीजबिल तोडणी संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी संतप्त शेतकऱ्यांसह जळगाव येथील अधिक्षक कार्यालयात तुफान राडा घातला आहे. त्यांनी थेट अधिक्षक अभियंत्याला खुर्चीला बांधलं होतं. या घटनेमुळे चाळीसगाव परिसरात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही शेतकऱ्यांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. यावेळी एमआयडीसी पोलिसांनी त्यांची उचलबांगडी करत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातूनच अटक केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील आदी नेते देखील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी आले होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

2 days ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

3 weeks ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

3 weeks ago

पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?

वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…

3 weeks ago

विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक संघाचे उल्लेखनीय यश

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…

3 weeks ago