सर्व प्रकारच्या राजकीय आणि धार्मिक मेळाव्यांना शनिावारी राज्य सरकारने पुढील सुचना येईपर्यंत बंदी घातली आहे. त्याच बरोबर मॉल आणि रेस्टॉरंट तसेच उद्यानेही रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यांत गेल्या काही दिवसांत करोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर केले आहे शनिवारी राज्यात करोनाचे बाधित सापडले. देशांत सापडणाऱ्या बाधितांमध्ये राज्यातील बाधितांचे प्रमाण हे जवळपास 50 टक्क्यांच्या घरात आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी शनिवारी राज्याला करोना नियंत्रणासाठी काही सुचना केल्या होत्या.राज्य सरकारने अधिसुचना काढून हे नवे निर्बंध लादले आहेत. पाचपेक्षा अधिक जणांना रात्री आठ ते सात यावेळेत एकत्र येता येणार नाही. अशी घटना आढळ्यास प्रत्येक व्यक्तीमागे एक हजार दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
रेस्टॉरंट जरी रात्री आठ वाजता बंद करायची असली तरी अन्न पदार्थांची होम डिलिव्हरी रात्री सुरू ठेवता येणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…