नाना पेठेतील अल्पना थिएटरजवळील नागझरी भिंतीलगत बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळाच्या नावाखाली अधिकृत पार्किग नसतानाही रिक्षा आणि दुचाकी चालकांना फसवून आणि धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या आण्णा आंदेकरसह एकावर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका 24 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. आंदेकर याच्यासह सागर थोपटे (रा.नाना पेठ) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेमध्ये नागझरी भिंतीलगत अधिकृत पार्किंग नसतानाही बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळच्या नावाने अधिकृत पार्किंग असल्याचे भासवून खोटे पावती पुस्तक छापून फिर्यादीकडून दोनदा धमकी देऊन आणि दहशत पसरवून 10 रूपये शुल्क वसूल करण्यात आले. याठिकाणी दररोज 350 ते 400 रिक्षा आणि दुचाकी पार्क होतात. त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली 3500 ते 4000 हजार रूपये खंडणी स्वरूपात वसूल केले जात आहेत. अशा प्रकारे नागरिकांकडून 90 हजार ते 1 लाख रूपये खंडणीद्वारे वसूल नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोपडे करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…