ताज्याघडामोडी

तरुणींन प्रियकरावर ॲसिडने केला हल्ला

मुलींवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याच्या अनेक भयंकर घटना तुम्ही आजव ऐकल्या असतील. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात एका मुलीनंच आपल्या प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack on Lover) केला आहे. ही घटना आग्रा जिल्ह्यातील हरीपर्वत परिसरातील आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारी मुलगी आणि मृत युवक हे दोघंही प्रियकर प्रेयसी होते आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-In Relationship) राहात होते. मात्र, या तरुणाचं लग्न दुसऱ्याच मुलीसोबत ठरल्यानं नाराज तरुणीनं हे पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, आरोपी प्रेयसी अद्यापही पोलिसांना सापडलेली नाही.

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना हरीपर्वत ठाण्याच्या क्षेत्रात घडली आहे. लिव्ह इनमध्ये राहाणाऱ्या या कपलमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. यानंतर नाराज प्रेयसी सोनमनं झोपेत असलेल्या देवेंद्र या आपल्या प्रियकरावर अ‍ॅसिड ओतून त्याठिकाणाहून पळ काढला. निधनाआधी देवेंद्रनं सांगितलं, की जेव्हा मी घरी गेलो तेव्हा तिनं मला चहा बनवून दिला. यानंतर मी झोपी गेलो. याचवेळी तिनं माझ्यावर अ‍ॅसिड ओतलं आणि ती पळून गेली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत देवेंद्र हा कासगंज जिल्ह्यातील रहिवासी होती. तर, आरोपी प्रेयसी सोनमा औरैया येथील राहाणारी होती. देवेंद्र एका पॅथोलॉजीवर काम करायचा तर सोनम एका रुग्णालयात नर्स होती. हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाले. यानंतर सोनमनं देवेंद्रवर अॅसिड हल्ला केला. उपचारासाठी देवेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपाचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago