महायुतीच्या काळातील घटनाक्रमाची महाविकास आघाडीच्या काळातही पुनरावृत्ती ?
शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शैला गोडसे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यात येत असलेल्या या विधानसभा पोटनिवडणुकीत बंडाचे निशाण फडकावणार का ? राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारा विरोधात त्या आपली उमेदवारी दाखल करणार का ? याची उत्सुकता जशी मतदार संघातील मतदारांना लागली आहे तशीच उत्सुकता शिवसैनिक आणि शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना लागली आहे.शैला गोडसे यांनी गत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र मात्र पुढे तो त्यांनी काढून घेतला.
दुरंगी लढत करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी परिचारकांना थांबा असे आदेश दिलेले असतानाच शिवसेनेचे वरिष्ठ नेते शैला गोडसे या काय भुमीका घेतात याकडे लक्ष ठेवून असल्याचे समजते.गतवर्षी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य असलेल्या शैला गोडसे यांनी पक्षाचा व्हीप झुगारत अनिरुद्ध कांबळे यांना पाठींबा दिला होता त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ वर्तुळात नाराजी होती.अशातच आता शैला गोडसे या पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील या बाबत साशंकता व्यक्त केली जात असली तरी आपण हि निवडणूक लढविणारच असा निर्धार शैला गोडसे या आपल्या गावभेट दौऱ्यात लोकांसमोर व्यक्त करताना दिसून येत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…