ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक दिव्यांग, ऐंशी वर्षावरील 15 हजार 470 मतदार टपाली मतदानासाठी  दोन मतदान केंद्रावर सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक दिव्यांग, ऐंशी वर्षावरील 15 हजार 470 मतदार

टपाली मतदानासाठी  दोन मतदान केंद्रावर सुविधा

निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती

   पंढरपूर(25):- 252- पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकसाठी  १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. कोरोनाच्या आजाराच्या संसर्गामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक, दिव्यांग तसेच कोविड बाधित रुग्णांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, निवडणुकीसाठी मतदार संघात  13 हजार 688  ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक तसेच 1 हजार 782 दिव्यांग मतदार  असल्याची असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची  निवडणुक  कोरोना संसर्गाच्या कालावधीत होत असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी  ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक व  दिव्यांग या पोस्टल मतदारासांठी घरोघरी जावून पोस्टल मतदान अर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे सर्व अर्जावर मतदारांचे नाव, मतदान यादी क्रमांकासह छपाई करण्यात आली आहे. यावर मतदारांनी स्वाक्षरी करुन भ्रमणध्वनी क्रमांक लिहावयाचा आहे. घरोघरी जावून भरलेले अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. दिव्यांग मतदारांनी त्यांचे दिव्यांग असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नेमण्यात आले आहेत. तसेच पंढरपूर व मंगळवेढा तहसिल कार्यालय या दोन ठिकाणी इच्छेनुसार टपाली मतदान  केंद्राची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. 

 या  मतदान  प्रक्रियेसाठी  निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रक्रीयेस मंजुरी मिळाल्यानंतर तीन दिवसांची तारीख मतदानासाठी जाहिर करण्यात येणार आहे. मतदारांना टपाली मतदानासाठी मतदान केंद्रात मतदारांना  सोयीनुसार मतदान करता येणार आहे.  यासाठी उमेदवारांना मतदान केंद्रावरती बुथ एजंट नेमता येणार आहेत. तसेच मतदारांची खात्री करण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म निरिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. 

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारसंघातील ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago