राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यावर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विटरवर शेफाली वैद्या नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर करत किती खोटं बोलणार असे म्हटले होते. याच व्हिडिओवर वेदश्री नावाच्या ट्विटर वापरकर्त्या तरुणीने पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजीत जाधव आणि त्यांच्ये मित्र अजित कदम यांनी बारामती तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले या प्रकरणी शरद पवार यांनी दिल्लीमधील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी म्हटले आहे की, सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांची भेट झाली नाही त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख हे क्वारंटाईन होते. हा व्हिडिओ पोस्ट करत शेफाली वैद्या नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, किती खोटं बोलणार याच पोस्टला कोट करत आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात केलेली पोस्ट राष्ट्रवादी कार्यकर्ते अभिजित कदम यांनी पाहिली. यानंतर त्यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…