२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत पंढरपूर शहर व मतदार संघात समाविष्ट असलेल्या तालुक्यातील २२ गावातून पुन्हा मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे चुरशीने मतदान होणार का ? याची चर्चा होत असतानाच या पोटनिवडणुकीत स्व.भारत भालके यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती भगीरथ भालके याना मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास भालके समर्थक व्यक्त करत आहेत.याच वेळी गत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती परंतु पंढरपुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली आणि सातारा येथील पावसाने मोठी सहानुभूती निर्माण झाली अशातच कमळ हे चिन्ह नडले असा दावा अनेक परिचारक समर्थक खाजगीत करताना दिसून येतात. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्व.आ.भारत भालके व आ.प्रशांत परिचारक यांच्यात लढत झाली होती.अतिशय चुरशीने झालेल्या या लढतीत ९ हजार ६० मतांनी प्रशांत परिचारक यांचा पराभव झाला होता.या निवडणुकीत पंढरपूर शहरातून परिचारक याना ९९३ मतांची आघाडी मिळाली होती.तर २२ गावातून भालकेंना चांगले मतदान झाल्याने केवळ १७५ चे मताधिक्य घेत पंढरपूर शहर तालुक्यात परिचारक आघाडीवर राहिले. २०१९ च्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारत भालके यांना पंढरपूर शहर व २२ गावातून मताधिक्य मिळणार का याचीच चिंता होती कारण मंगळवेढ्यात ते परिचारक यांच्या पेक्षा पुढे असणार असा त्यांना ठाम विश्वास होता.या निवडणुकीत पंढरपूर शहरात भालकेंना थोडक्या मताची आघाडी मिळाली होती मात्र तालुक्यातील २२ गावात मिळून हि आघाडी ५ हजरांच्या आसपास राहिली आणि भारतनानांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.फडणवीस सरकार बद्दलची नाराजी आणि कमळ चिन्हांबाबत काही मतदारांमध्ये असलेली नाराजी याचा फायदा स्वर्गीय भालकेंना झाला होता. आता सुधाकरपंत परिचारक आणि भारतनाना दोघेही ह या त नाहीत.भारतनानांचा वारसा राजकीय वारसा भगिरथ भालके पुढे नेऊ इच्छितात तर प्रशांत परिचारक हे सध्यातरी विधानपरिषदेचे आमदार आहेत.ते हि पोटनिवडणूक भविष्यातील मध्यावधी निवडणूक लक्षात घेऊन लढवू इच्छित नाहीत अशी चर्चा त्यांचे काही समर्थक करत असले तरी परिचारकांनी हि पोट निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तरच पंढरपूर शहर आणि तालुक्यातील २२ गावात चुरस पहावयास मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
| |
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…