लग्नाला तयार नसल्याने मुलीच्या डोक्यात खोरे घालून पित्यानेच तिचा खून केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील बनपूरी येथे घडली आहे. खुनानंतर चौघांच्या मदतीने पित्याने मुलीचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र, मृतदेह अर्धवट जळल्याने तो मध्यरात्रीच दफन करण्यात आला. दरम्यान, आठ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीला आला असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ताई उत्तम चौगुले (वय 18) असे मृत मुलीचे नाव असून, उत्तम महादेव चौगुले (वय 42) याला अटक केली आहे.
चौगुले हा बनपुरी येथे पूर्वेला चौगुले वस्तीवर कुटुंबीयांसोबत राहत होता. त्यांची मुलगी ताई हिला पाहण्यासाठी रविवारी (दि. 14) रोजी रविवारी पाहुणे येणार होते. मात्र, मुलगी लग्नास तयार नव्हती. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले. संतापलेल्या उत्तम चौगुले याने खोऱयाने मुलीला मारहाण केली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर घरात स्वच्छता करून, शेजाऱयांसमोर मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. आसपासची वस्तीवरची अनेक माणसे अंत्यविधीसाठी जमा झाली; परंतु घटना संशयास्पद वाटल्याने बहुतांशजण गायब झाले. चौगुले यांनी ताईला बघायला येणाऱया पाहुण्यांनाही याची माहिती दिली नाही. आरोपी उत्तम चौगुलेने अन्य चौघांना सोबत घेऊन घराशेजारीच असलेल्या ओढापात्रात शेतातील लाकडे गोळा करून मध्यरात्री अंत्यविधी केला. प्रेत अर्धवट जळल्यामुळे पहाटे ते ओढा पात्रातच दफन केले. तिसऱया दिवशी रक्षाविसर्जनही केले नाही. दरम्यान, आज ही घटना उघडकीला आली असून, पोलीस पाटील हणमंतराव पाटील यांनी वर्दी दिली आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…