कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका तरुणावर गोळीबार करणाऱ्या मुनाफ पठाण टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी संघटीत टोळ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतर मोक्का आणी तडीपारीच्या कारवाया वाढल्या आहेत.
मुनाफ रियाज पठाण ( 23) , कृष्णाराज सुर्यकांत आंदेकर (दोघेही रा.डोके तालमी जवळ, नाना पेठ), विराज जगदिश यादव(25,रा.हहपसर), आवेश अशफाक सय्यद(20,रा.गणेश पेठ), अनिकात ज्ञानेश्वर काळे(25,रा.नाना पेठ), अक्षय नागनाथ कांबळे (23,रा.हडपसर), शेरु अब्दुल रशीद शेख(34, गुरुवार पेठ), ओमकार शिवप्रसाद साळुंके(21,रा.नाना पेठ), अमन युसूफ खान (20, रा.नाना पेठ), यश सुनिल ससाणे (रा.हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यांच्या विरुध्द समर्थ, हडपसर, फरारसखाना आणी कोंढवा पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे केले आहेत.
आरोपी मुनाफ पठाण हा टोळीप्रमुख असून त्याच्या अधिपत्याखाली इतर आरोपी गुन्हे करत आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी आरोपींवर मोक्का लावण्याचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण व उपायुक्त नम्रता पाटील यांना पाठवला होता. कागदपत्रांची छाननी केल्यावर मोक्काची कलमे समाविष्ट करण्यात आली.याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते करत आहेत. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, जगदीश पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र ननावरे व जगदीश पाटील यांनी केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…