ताज्याघडामोडी

पोलीस वेळेत पोहचत नाहीत म्हणत शहर पोलीस ठाण्यात तरुणाने केला आक्षेपार्ह शब्दप्रयोग

पंढरपूर शहरातील सांगोला चौक परिसरात सोमवारी रात्री दोन गटात जोरदार धूमचक्री झाली असून या हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी एकमेका विरोधात तक्रारी दाखल कारण्यासाठी दोन्ही गटातील लोक पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या हेतूने दाखल झाले होते.यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाल्याने ती हटविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गाडेकर व सहकारी पोलीस कर्मचारी गर्दी हटवत असताना  सागर गायकवाड रा. आंबेडकर नगर पंढरपूर याने पोलीस .. आहेत,पोलीस जेथे पोहचायचे तेथे वेळेत पोहचत नाहीत व येथे उशीरा येवून आम्हांला हाकलून बाहेर काढत आहेत. आमच्या समाजावर अन्याय होत आहे असे म्हणत होता. त्यावेळी गाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयन्त केला असता शर्टाची कॉलर पकडत अपशब्द वापरत सरकारी कामात अडथळा आणला या आरोपाखाली विरुध्द भा.द.वि. कलम 353, 332 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटनेची पार्श्वभूमी
फिर्यादी जबाब १ –
फिर्यादी जबाब दि. 16/03/2021मी उमेश भनवान सर्वगोड, वय 30 वर्षे, धंदा कंत्राटदार, रा. घर क्र. 487, संतपेठ, महापौर चाळ, पंढरपूर समक्ष पोलीस ठाणेत हजर राहुन फिर्यादी जबाब देतो की, मो. 7219188383मी वरील प्रमाणे असुन वर नमुद पत्त्यावर माझे जन्मापासुन आई विजया, वडील भगवान, भाऊ सुहास, बहीण किरण असे एकत्रात राहणेस आहे. मी खाजगी घरबांधकामाची कामे घेवुन त्यापासुन मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मी सन 2015 साली पंढरपूर नगरपरिषदेचा स्विकृत नगरसेवक होतो. त्यामुळे समाजातील लोकांच्या अडीअडचणी सोडवणे, धार्मिक सन, उत्सव व सामाजिक कार्यक्रम पार पाडणे यामध्ये माझा सक्रिय सहभाग असतो. दरवर्षी आम्ही महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करीत असतो. यावर्षी सुद्धा 14 एप्रिल रोजीची ड. बाबासाहेब आंबेडकर जयंती समाजामध्ये मोठ्या उत्साहात साजरी कऱण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी माझ्यावर सोपवली होती. त्यानुसार काल दि. 15/03/2021 रोजी रात्री 08/00 वा. सु. भिमशक्ती चौक, महापौर चाळ, पंढरपूर येथे दि. 14 एप्रिल रोजीच्या ड. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनाची चर्चा करणेकरीता मी सोबत माझा लहान भाऊ सुहास सर्वगोड, चुलत भाऊ ऋषीकेश सर्वगोड, अदित्य गावकरे, गणेश घंटे, सुरज घंटे असे जमुण चर्चा करीत होतो. त्यानुसार दि. 16/03/2021 रोजी आमच्या सर्व समाजाची लोक जमुन व्यायाम शाळेशेजारी सायंकाळी 07/00 वा. सु. मिटींग घेण्याचे नियोजीत केले होते. त्यावेळी आमच्या चर्चेमध्ये जमलेल्या काही लोकांनी मला सांगितले की, संतोष नारायण सर्वगोड रा. आंबेडकरनगर, पंढरपूर यानेही दि. 16/03/2021 रोजी सायंकाळीच आमच्या समाजातील लोकांची ड. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमीत्ताने नियोजनाची बैठक आयोजीत करुन लेखी परिपत्रक काढुन प्रत्येक घरातील एका व्यक्तिचे नाव टाकुन त्यांनी पदाधिकारी निवडीसाठी परिपत्रकामध्ये नाव असणाऱ्या प्रत्येकास हजर राहणेबाबत सक्ती केली आहे. ही गोष्ट मला मिटींगमध्ये समजल्यानंतर मी जेष्ठ सभासद शिवाजी चंदनशिवे यांना माझ्या मोबाईल वरुन कल करुन विचारले की, दरवर्षी आपण एकत्रात जयंती साजरी करीत असतो, तु या वर्षी आम्हाला न विश्वासात घेता तुम्ही स्वतंत्र जयंती नियोजन करीत आहात. तुम्ही आम्हाला याची काहीही कल्पना न देता स्वतंत्र मिटींगला हजर राहणेबाबत सक्ती कशी करता असे मी त्यांना विचारले असता ते मला रागात म्हणाले की, तु काय लय मोठा नेता लागुन गेलास काय समाजामध्ये काय दादा बनायचे आहे का तुला असे म्हणातचा मी त्यांना शांततेत समजुन सांगितले की, मी आत्ता भिमशक्ती चौक येथे बसलो आहे. तुम्ही समोर या आपण शांततेत विषय मार्गी लावुया, असे बोलुन मी फोन बंद केला व मी तेथेच त्यांची वाट पाहत थांबलो होतो. त्यानंतर रात्री 10/30 वा. सु. तेथे 1) शिवाजी चंदनशिवे त्याचेसोबत 2) संतोष नारायण सर्वगोड, 3) रविंद्र दिलीप सर्वगोड, 4) सिद्धार्थ हरी सरवदे, 5) लक्ष्मण लामकाने, 6) अजय चंदनशिवे, 7) ऋषिकेश भोरकडे,8) लखन संतोष सर्वगोड,9) इंद्रजित दिलीप सर्वगोड, 10) नवनाथ गायकवाड,11) दत्ता चंदनशिवे व12) इतर तीन-चार अनोळखी व्यक्ती सर्व रा.संतपेठ,पंढरपुर ह्या हातात धारदार लोखंडी कोयता, लोखंडी पाईप व लाकडी दांडके घेवुन आमच्या दिशेने मोठ्याने शिव्या देत पळत आले. त्यामध्ये सिद्धार्थ सरवदे हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठ्याने ओरडला थांब तुला आता जिवंत सोडत नाही, तुला ठारच करतो असे माझ्या दिशेने अंगावर आला. त्यावेळी त्याने त्याचे उजव्या हातातील लोखंडी धारदार कोयता हा माझ्या मानेवर मारत असताच माझा लहान भाऊ सुहास याने सिद्धार्थ सरवदे याला ढकलले. त्यामुळे माझ्या मानेवरील कोयत्याचा वार हुकुन तो कोयता त्याला बाजुला ढकलत असलेला माझा भाऊ सुहास याचे डोक्यात लागुन तो खाली पडला. तोवरच संतोष सर्वगोड याने त्याच्या हातातील लोखंडी पाईप जोरात माझ्या डोक्यात मारला त्यामुळे मी तेथेच पडलो. त्यावेळी तेथे जवळच असणारे माझे वडील भगवान सर्वगोड हे भांडण सोडवण्यासाठी आले असता लखन लामकाने याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने माझ्या वडीलांच्या डोक्यात मारले. तेव्हा माझी आई विजया ही वडीलांना वाचविण्यासाठी धावत गेली असता बेबी हरी सरवदे हिने तिच्या डोक्यात लाकडी दांडके मारल्याने तिच्या डोक्यात जखम होवुन रक्त आले. तसेच अजय चंदनशिवे हा बोलला आज ह्यांना जिवंतच सोडायच नाही, लय झालय यांच, आज सगळ्यांचा निकालच लावुया असं म्हणुन त्याचे हातात असलेली काठी त्याने शेजारी उभी असलेली माझी बहिण किरण सर्वगोड हिला मारली, ती तिच्या डोळ्याला लागली. तेव्हा रविंद्र सर्वगोड, ऋषिकेश भोरकडे, लखन संतोष सर्वगोड, इंद्रजित सर्वगोड, शिवाजी चंदनशिवे, दत्ता चंदनशिवे, नवनाथ गायकवाड, यांनी मला व माझे भाऊ व वडील यांना खाली पाडुन लाथाबुक्क्याने जोरजोरात मारहाण केली. तेव्हा डोळ्याला मार लागलेली माझी बहिण किरण हिने वाचवावाचवा म्हणुन आरडा ओरडा करत गल्लीत पळत गेली तेव्हा गल्लीतील लोक जमल्यावर संतोष सर्वगोड हा म्हणाला यांना नंतर बघुन घेवु असे म्हणुन ते सर्वजन तेथुन निघुन गेले. त्यानंतर आम्ही पोलीस ठाणेस तक्रार देणेकरीता आलो.तरी वरील तारखेस वेळी व ठिकाणी मी स्वतंत्रपणे ड. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करणार असल्याचा राग मनात धरुन यातील आरोपी नामे शिवाजी चंदनशिवे त्याचेसोबत संतोष नारायण सर्वगोड, रविंद्र दिलीप सर्वगोड, सिद्धार्थ हरी सरवदे, लक्ष्मण लामकाने, अजय चंदनशिवे, ऋषिकेश भोरकडे, लखन संतोष सर्वगोड, इंद्रजित दिलीप सर्वगोड, नवनाथ गायकवाड, दत्ता चंदनशिवे व इतर तीन-चार अनोळखी व्यक्ती ह्या आमच्या दिशेने हातात धारदार लोखंडी कोयता, लोखंडी पाईप व लाकडी दांडके घेवुन मोठ्याने शिव्या देत पळत आले. त्यावेळी सिद्धार्थ सरवदे याने त्याचे उजव्या हातातील लोखंडी धारदार कोयता हा मला जीवे मारण्यासाठी मानेवर मारत असताच माझा लहान भाऊ सुहास याने सिद्धार्थ सरवदे याला ढकलले. त्यामुळे माझ्या मानेवरील कोयत्याचा वार हुकुन तो कोयता त्याला बाजुला ढकलत असलेला माझा भाऊ सुहास याचे डोक्यात लागुन तो खाली पडला. तोवरच संतोष सर्वगोड याने त्याच्या हातातील लोखंडी पाईप जोरात माझ्या डोक्यात मारला त्यामुळे मी तेथेच पडलो. तसेच लखन लामकाने याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने माझ्या वडीलांच्या डोक्यात मारले. तेव्हा माझी आई विजया ही वडीलांना वाचविण्यासाठी धावत गेली असता बेबी हरी सरवदे हिने तिच्या डोक्यात लाकडी दांडके मारल्याने तिच्या डोक्यात जखम होवुन रक्त आले. तसेच अजय चंदनशिवे याने त्याच्या हातात असलेली काठी शेजारी उभी असलेली माझी बहिण किरण सर्वगोड हिला मारली, ती तिच्या डोळ्याला लागली. तेव्हा रविंद्र सर्वगोड, ऋषिकेश भोरकडे, लखन संतोष सर्वगोड, इंद्रजित सर्वगोड, शिवाजी चंदनशिवे, दत्ता चंदनशिवे, नवनाथ गायकवाड, यांनी मला व माझे भाऊ व वडील यांना खाली पाडुन लाथाबुक्क्याने जोरजोरात मारहाण करुन मला, माझे वडील भगवान, भाऊ सुहास, बहीण किरण यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करुन जखमी केले. म्हणुन माझी त्यांचेविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. माझा वरील जबाब मराठीत लिहीला असुन तो मी वाचुन पाहिला. तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर लिहीला आहे.
फिर्यादी जबाब 2 –
फिर्यादी जबाब दिनांक 16/03/2021मी सिध्दार्थ हरी सरवदे, वय 30 वर्षे. धंदा मजूरी , जात महार, रा. भिमशक्ती चौक 9 नंबर शाळेजवळ,संतपेठ, पंढरपूर, मो.नं. 9850708667 पंढरपूर शहर पोलीस ठाणेस समक्ष हजर राहून फिर्यादी जबाब देतो की,मी वरील ठिकाणी आई वडील व दोन बहीणी सह एकत्रीत राहणेस असून मजूरी करून त्यावर माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.काल दिनांक 15/03/2021 रोजी संध्याकाळी 07/30 वा. चे सुमारास ड. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी साजरी करायची की नाही याबाबत समाजीतील लोकांचे मत जाणून घेणेसाठी संतपेठ येथील भिमशक्ति चौक येथे दिनांक 16/03/2021 रोजी मिटींग घ्यायचे नियोजीत केले होते. त्याचे नियोजन करण्याची तयारी सुरू होती त्याबाबत एक पत्रक काढले होते. याची बातमी उमेश भगवान सर्वगोड रा. संतपेठ यास मिळाली असता त्याने शिवाजी चंदनशिवे यास फोन करून कोणत्या आई घाल्याने पत्रक फिरवले असे म्हणून शिविगाळ केली यावेळी शिवाजी चंदनशिवे यांनी फोनवर उमेश सर्वगोड यास तुम्ही भिमशक्ती चौकात आत्ताच्या आत्ता या असे बोलून फोन ठेवून दिला.दिनांक 15/03/2021 चे रात्री 10/30 वा. चे सुमारस शिवाजी चंदनशिवे यांचे जावई कैलास शिंदे, वय 23 वर्षे, रा. संतपेठ यास माऊली किराणा दुकान संतपेठच्या समोर खाली नमूद लोकांनी रस्त्यावर एकट्याला गाठून त्यामधील सुहास सर्वगोड व सुमीत माने यांनी आयघाल्याना सगळ्यानां एकदा बघीतले पाहीजे यांचे हात पाय मोडले पाहिजेत असे बोलले त्यावरून कैलास शिंदे याने घरी येवून त्यांचे सासरे शिवाजी चंदनशिवे व मला वरील घटना सांगितले नंतर मी, कैलास, शिवाजी चंदनशिवे असे तीघे मिळून माऊली किराणा दुकानाजवळ रस्त्यावर (1)सुहास भगावान सर्वगोड(2) उमेश भगवान सर्वगोड (3) पिंटू रणपिसे (4) सुमीत सुखदेव माने (5) आदित्य शांतीदूत गावकरे(6) लखन विठ्ठल सर्वगोड (7) शांतीदूत सेनापती गावकरे (8) सुखदेव माने (9) ऋषी सर्वगोड (10) विजया सर्वगोड (11) किरण सर्वगोड (12) संविधान भारत चव्हान हे उभे असताना आम्ही जावून त्यांना शिवीगाळ का केली व असे का बोलले याबाबत विचारणा केली असता सर्वप्रथम सुहास भगवान सर्वगोड वय अंदाजे 28 वर्षे याने हाताबुक्याने मारहान केली त्यावेळेस आम्ही आमचा बचाव करण्याचा प्रयत्न केला व असे करण्याचे कारण विचारले असता त्याठिकाणी असलेले वर नमूद लोकांनी आम्हाला लाथाबुक्यानी मारण्यास सुरवात केली. त्याचवेळेस गल्लीत आरडाओरडा सुरू झाला तो गोंधळ एकून माझे मामा संतोष सर्वगोड, गणेश शिंदे, बेबी हरी सरवदे, रूपाली हरी सरवदे हे सर्व त्याठिकाणी आले. त्यानी आम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळस उमेश सर्वगोड याचे माझे मामा संतोष सर्वगोड यांची कलर पकडली व हातबुक्याने मारहान केली व त्यांनी आधीपासूनच ऋषी उत्तम सर्वगोड याचे घरी लपवून ठेवलेले कोयता,काठ्या, प्लास्टीक व स्टीलचे पाईप हे सुहास भगवान सर्वगोड व त्याचे साथीदार सुमीत माने, लखन सर्वगोड, आदित्य गावकरे, शांतीदूत गावकरे व इतर काहीजण वरील लपवून ठेवलेले लाठ्या-काठ्या, पाईप, कोयता हे घेवून मला व मला सोडवायला आलेले माझी आई बेबी सरवदे, बहीण रूपाली सरवदे व मामा संतोष सर्वगोड, गणेश शिंदे यांच्यावर हल्ला चढवला यामध्ये सुहास सर्वगोड याने या भेनच्योदाना आज जिवंत सोडायचे नाही, सगळ्यांना आज कापूनच टाकतो असे बोलून त्याच्या हातातील कोयत्याने माझ्या डोक्यात मारत असताना तो वार माझ्या दोन्ही हाताने अडवला त्यामध्ये माझ्या दोन्ही हाताच्या मनगटाला तसेच मानेला गंभीर जखम झाली आहे. मला सोडवत असताना माझी आई बेबी सरवदे हीला विजया सर्वगोड व किरण सर्वोगोड यांनी पाईपने मारहाण केली त्यामुळे तीच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ गंभीर जखम झाली आहे व डोक्याला मुकामार लागलेला आहे. तसेच माझी बहीण रूपाली सरवदे हीला विजया सर्वेगोड हिने काठीने मारहान केली त्यामध्ये तीच्या उजव्या हताला मुकामार लागला त्यावेळी माझे मामा संतोष सर्वगोड आम्हा सगळ्या जखमींना घेवून पोलीस स्टेशनला येत असताना उमेश सर्वगोड, पिंटू रणपिसे यांनी माझ्या मामाची कलर पकडून त्यांना शिवीगाळ करत तुम्ही आत्ता वाचलाय पण तुम्ही पोलीसांकडे गेला तर जीवे सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर मला व माझे आई व बहीणीस माझे मामा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी घेवून आले असता पोलीसांनी आम्हाला वैद्यकिय उपचाराकरीता उपचार यादी देवून उपजिल्हा रूग्णालय पंढरपूर येथे पाठवले. तेथे उपचार घेवून मी परत पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्याद देत आहे.तरी काल दिनांक 15/03/2021 रोजी रात्री 10/30 वा. चे सुमारास वर नमूद इसमांनी ड. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजीत करण्यासाठी काढण्यात आलेल्या पत्रकामध्ये आमचे नाव का टाकले नाही या कारणाने मला व माझी आई बेबी सरवदे, बहीण रूपाली सरवदे यांना कोयता, लाठ्या, प्लास्टीक व लोखंडी पाईप याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे ठार मारणेची धमकी व शिवीगाळ केली आहे म्हणून माझी त्यांचेविरूध्द कायदेशीर फिर्याद आहे.माझा वरील संगणकावरील टंकलिखीत केलेला जबाब माझे सांगणे प्रमाणे बरोबर आहे. तो मी वाचून पाहिला आहे. हा जबाब लिहून दिला स.ता.म.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

8 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

8 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago