पुणे: कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आठ वाहनांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्रिटिश कालीन छत्रपती शिवाजी मार्केटची वास्तू दोनशे वर्षे जुनी आहे. या मार्केटमध्ये मासे, चिकन विक्रेते आणि भाजीपाला-फळ विक्रेत्यांचे गाळे आहेत. मार्केटमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंजूर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मार्केटमधील १७ मासेविक्रेत्यांचे गाळे आणि आठ चिकन विक्रेत्यांचे गाळे पूर्णपणे जळाले असून, दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मार्केटचे लाकडी छत, जुनी सागवानी लाकडे बेचिराख झाली आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…