ताज्याघडामोडी

मंगळवेढा येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव

मंगळवेढा येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव

 

     पंढरपूर, दि. 15:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 23 मार्च 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत तसेच मौजे सिध्दापूर येथील सन 2018-19 मधील संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावामधील एकूण सुमारे  6 हजार 144.84  ब्रास वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असून, हा वाळू साठा मौजे सिध्दापूर येथे 4 हजार 644.84, माणनदी पात्रातील गट नं.89 येथे 500 ब्रास,मौजे ढवळस माणदीतील विहीरी शेजारी  1 हजार 500 ब्रास असा एकूण  4 हजार 644.84  वाळू साठा  ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे  दोन कोटी 27 लाख 35 हजार 908 रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार  दिनांक 22 मार्च  2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा, उपविभाग विभाग मंगळवेढा यांच्याकडे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी भोसले यांनी सांगितले.

   सदर लिलावात भाग घेण्यासाठी  25 टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे  भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये 2 हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची 25 टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात 7 दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

1 week ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

4 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago