गोरगरिबांची पोरं शिकून सवरून मोठी व्हावीत म्हणून राज्यात गेल्या शतकात अनेक थोर शिक्षण महर्षींनी खाजगी शिक्षण संस्था स्थापन केल्या,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अतिशय हालाखीतून रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली,महर्षी कर्वेंनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था काढून राज्यातील हजारो गोरगरीब कुटूंबातील मुलींना निवासी शिक्षणाची सोय करून दिली त्याच प्रमाणे अनेक शिक्षण महर्षींनी उद्दात दृष्टिकोनातून शिक्षण प्रसारक संस्थांच्या माध्यमातून राज्यात गाव तिथे शाळा उपलब्ध करून देण्यात सिहाचा वाटा उचलला.पुढे राज्यात १९८६ पासून अनुदानित,अंशतः अनुदानित असे टप्पे पाडत शिक्षण संस्थांच्या मान्यतेला बळ मिळाले आणि नोकर भरतीच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था चालक मनमानी करू लागल्याचे दिसून आले.सेवा जेष्ठतेनुसार अनेक ठिकाणी मागासवर्गीय समाजातील मुख्याध्यापक होतोय म्हणून त्यास हे पद नाकारण्यात आल्याच्या घटनाही वेळावेळी दाखल तक्रारीतून निंदर्शनास आलेल्या आहेत.मात्र केवळ मागासवर्गीय असल्याने अनुकंपा खालील शिपाई पदावर देखील नियुक्ती देण्यास हेतुपुरस्पर टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकारही आता जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर बाबर यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील विद्या मंदिर हायस्कुल येथे तक्रारदार अर्जुन सोनवले यांचे वडील शिपाई या पदावर कार्यरत असताना २००७ मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले होते.वडिलांच्या रिक्त पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळावी म्हणून अर्जुन सोनवले हे सातत्याने प्रयन्त करत होते मात्र शिक्षण संस्था चालकांनी त्यांना या पदावर सामावून घेण्यास टाळाटाळ सुरु केली.अखेर अर्जुन सोनवले यांनी याबाबत जिल्हा माध्यमीक शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली मात्र त्या ठिकीणीही त्यांना हेतुपुरस्पर डावलले जात असल्याने त्यांनी सोलापूर सदर बझार पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा तक्रार दाखल केली आहे.
राज्यातील अनेक बड्या शिक्षण संस्थांमध्ये पदभरतीत होणारी वशिलेबाजी,अर्थकारण आणि मागासवर्गीय प्रवर्गातील पदभरती आणि पदोन्नती या बाबत केला जाणारा दुजाभाव याबाबत सातत्याने दाखल तक्रारीमुळे चर्चा होत आली असून काही शिक्षण संस्थांमध्ये तर जात,धर्म निरपेक्ष संस्थापकांनी स्थापण केलेल्या शिक्षण संस्था राजकीय दबावातून बळकावून अगदी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना देखील जातीय मानसिकता जोपासली जात असल्याची चर्चा आहे. तर केवळ मागासवर्गीय मुख्याध्यपक नको म्हणून काही संस्थाचालक ”राजकारण” करीत आल्याचे निदर्शनास आले आहे.मात्र सेवानिवृत्तीचा काळ जवळ आल्याने अनेकांनी तक्रारी न करता तडजोडीही केल्याचे आढळून येते. अनुकंपा खालील शिपाई पदासाठी अर्जुन सोनवले हे देत असलेला लढा यशस्वी होणार का याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…