एपीआय सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. याप्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.
जामीन फेटाळताना कोर्टाने स्पष्ट म्हटलंय, “त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे” सचिन वाझे यांनी काल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला. ज्याला कोर्टाने नकार दिला.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय रायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…