स्वेरी फार्मसीच्या तीन विद्यार्थिनी सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेत स्वेरी संचलित बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या अपूर्वा जवंजाळ, ईश्वरी शिदवाडकर व मोनिका मासाळ ह्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ओसाड माळरानावर १९९८ साली स्वेरीची अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर या शिक्षण संकुलाची स्थापना झाली. पुढे स्वेरीला पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला, स्वेरीतील शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळू लागले. सुरवातीला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओघ असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आज मोठमोठ्या शहरातील विद्यार्थी देखील प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. या चढत्या आलेखामुळे पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फार्मसी महाविद्यालय देखील काढावे अशी मागणी जोर धरू लागली. नागरिकांच्या मागणीला स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे अखेर सन २००६ साली बी.फार्मसीची स्थापना केली. अभियांत्रिकी प्रमाणेच पुढे फार्मसीचा देखील आलेख वाढतच राहिला. गेल्या वर्षी फार्मसीला राष्ट्रीय दर्जाचे एन. बी. ए. मानांकन देखील मिळाले. स्वेरीच्या बी. फार्मसीने देखील सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर राहण्याचा मान मिळविला. बी. फार्मसीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत अपूर्वा संजय जवंजाळ (सीजीपीए -९.५६), ईश्वरी हेमंत शिदवाडकर (सीजीपीए-९.४४) व मोनिका सहदेव मासाळ (सीजीपीए-९.४२) या विद्यार्थिनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आल्या. त्यांना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, वर्गशिक्षक प्रा. रामदास नाईकनवरे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम आलेल्या तीनही विद्यार्थीनींचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इन्चार्ज, प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…