कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे सुंदर हस्ताक्षराबद्दल “कु.सई कोले” इ.२ रीतील विद्यार्थीनीचा मान्यवरांकडून बक्षिस देवून सन्मान
शनिवार दि.१३.०३.२०२१ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतनच्या इयत्ता २ री तील कु.सई प्रदीप कोले या विद्यार्थीनीने सुंदर हस्ताक्षर काढण्यात व तिच्या उत्कृष्ट पठण क्षमतेमुळे प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके तसेच शिक्षक यांचे हस्ते सईच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिस देवून तिचा सन्मान करण्यात आला.
सई बद्दल कौतुक व्यक्त करताना प्रशालेच्या प्राचार्या सौ. शैला कर्णेकर म्हणाल्या की, सई प्रशालेमध्ये खूपच शांत व सुस्वभावी अशी असल्यामुळे वर्गातील इतर विद्यार्थी तिचे अनुकरण करतात त्याचबरोबर या विद्यार्थीनीचा मराठी, इंग्रजी या विषयांवर असणारे प्रभुत्व व सर्व धडे, पान नंबरसहीत लक्षात राहणा-या उत्तम स्मरणशक्तीद्वारे तिला अभ्यासाचा फारसा ताण पडत नाही ही बाब उल्लेखनीय अशी आहे.
यावेळी सईच्या आई-वडिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सईला कॅलीग्राफी कोर्स लावल्यामुळे तिचे अक्षर सुंदर होत गेले तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनाही कॅलीग्राफीचा कोर्स करण्याचे आवाहन केले.
भविष्यात आपल्या मुलीला जिल्हाधिकारी बनविण्याचे स्वप्न आम्ही बाळगून आहोत व त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत असे प्रतिपादन सईच्या पालकांनी केले.
तिच्या या शैक्षणिक घडणजडीत व तिच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर व सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, कु.सई कोले, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…