पंढरपूर, दि. 11:- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत 109 प्रकरणे समीतीच्या सभेत मंजूर करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 52 प्रकरणे व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 57 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
राज्यशासनामार्फत संजय गांधी निराधार योनेत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिक तसेच श्रावणबाळ योजनेत 65 वर्षावरील वृध्द निराधार व्यक्तींना लाभ दिला जातो. या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यांनी बँक पास बुकची छायाकिंत प्रत व फोटो तात्काळ तहसिल कार्यालय पंढरपूर येथे जमा करावेत असे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना अनुदानाचा लाभ घेत आहे आहेत. अशा लाभार्थ्यांनी माहे जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष हजर राहून सादर करावेत. अन्यथा माहे एप्रिल 2021 पासन संबधित लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात येईल असे आवाहनही तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…