महिला दिनी दोन महिलांसह ४ जणांविरोधात बारामतीच्या महिला अधिकाऱ्यांनीच केली कारवाई
महीला अरोपी व निलंबित पोलीसांकडून प्रतिष्ठीत व्यक्तींवर हनीट्रॅप करून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी गजाआड केले आहे. यामध्ये दोन महिला आरोपींचा देखील समावेश आहे.
ते चौघेजण हनीट्रॅप करायचे प्रतिष्ठित लोक गाठायचे, त्यांच्यावर हनीट्रॅप करायचा आणि खंडणी वसूल करायची अशी या टोळीची पद्धत होती. त्यांनी दहा ते बारा आतापर्यंत गुन्हे केले आहेत. बारामतीत महिला दिनाच्या दिवशी महिला पोलिसांच्या हातात कारभार होता आणि या महिला अधिकाऱ्यांनीच या हनीट्रॅपची टोळी उध्वस्त केली. विशेष म्हणजे चार जणांना अटक केल्यानंतर हनीट्रॅप घडवून आणणारा मास्टरमाइंड हा मुंबईतील बडतर्फ पोलीस निघाला आहे.
बारामती पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली. स्मिता दिलीप गायकवाड (वय 23 रा. फलटण), आशिष अशोक पवार (वय 27 रा.भुईंज ता. वाई), सुहासिनी योगेश अहिवळे (वय 26 रा. फलटण) व राकेश रमेश निंबोरे (24 रा. फलटण) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. पोलीस त्यांच्याकडून कसून तपास करीत असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…