ताज्याघडामोडी

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत जलसंपदा मंत्र्याना सुचना करु

पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांना वरदान ठरणारी उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. त्याबाबत आपण स्वता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना त्याबाबत सूचना करू व ते काम मार्गी लावण्याच्या सूचना करणार असल्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा शरद पवार यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांना दिले आहे.दुष्काळी 35 गावातील शेतकर्‍याच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी आतिषय महत्वाची समजली जाणारी 2 टी एम सी पाणी व 5,30 कोटींच्या या उपसा सिंचन योजनेला सण 2014 साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा, उपोषण, आंदोलन करूनही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडली आहे. आता सुरू आसलेल्या अधिवेशनात तरी किमान या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, त्यासाठी निधीची तरतूद करावी व प्रत्यक्ष कामाला तात्काळ सुरुवात करावी यासाठी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा शरद पवार यांची मुंबई येथील सिल्व्हरओक निवासस्थानी भेट घेऊन मागणी केली आहे. शिवाय या मतदार संघात आता पोट निवडणूक होणार आहे त्याची आचारसंहिता केव्हाही लागू शकते त्या आगोदर प्रशासकीय मान्यता देऊन दुष्काळी 35 गावातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा आशी मागणी शैला गोडसे केली आहे.

यावेळी शैला गोडसे यांनी दिवंगत आ भारत भालके यांच्या निधनानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपसा सिंचन योजना मार्गी लावणे हीच खरी स्व भारत नानांना श्रद्धांजली ठरेल असे वक्तव्य केले होते. याचीही आठवण करून दिली.त्यावर खा. शरद पवार यांनी या योजनेबाबत विधमान सरकार सकारात्मक आहे. सध्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आजारी असल्याने कामकाजात सहभागी होत नाहीत. ते येत्या काही दिवसात अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात संसदीय कामकाजात सहभागी होतील त्यावेळी आपण स्वता या योजनेबाबत त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासठी सूचना करू, शिवाय आताच्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यासठी ही प्रयत्नशील आसल्याचे खा. शरद पवार यांनी संगितले आहे. येत्या काही दिवसांमध्ये पंढरपुर मंगळवेढा मतदार संघात राष्ट्रवादीचे दिवंगत आ भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक होत आहे. शिवसेना नेत्या शैला गोडसे ही या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आता उपसासिंचन योजना, पाणी, प्रश्‍नावर थेट खा शरद पवार यांची भेट घेतल्याने नव्या चर्चाना उधाण आले आहे.

 

 

 

 

बारामतीची आणखी एक बातमी आहे ती देखील घ्यावी हनीट्रॅप रॅकेटवर कारवाईची

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago