मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोळी जमातीला न्याय दिला तर हीच शिवसेना नेते अनंत तरे यांना खरी श्रध्दांजली ठरेल- गणेश अंकुशराव
पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदिवासी कोळी जमातीला न्याय देणे म्हणजे हीच स्वर्गीय शिवसेना नेते अनंत तरे यांना खरी श्रध्दांजली ठरेल! असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले. दिवंगत शिवसेना नेते,माजी आमदार, ठाणे चे माजी महापौर, पालघरचे शिवसेना संपर्क प्रमुख स्व. अनंत तरे यांच्या अस्थिकलशाचे चंद्रभागेत विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांना आदरांजली वाहताना गणेश अंकुशराव बोलत होते.
शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी ज्यांनी आपली संपुर्ण हयात घालवली, ज्यांच्यामुळे ठाणे, मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीचे समाजबांधव शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले त्या तरे साहेबांचं समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठीचं स्व्प्नं मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तरे साहेबांच्या हयातीत पुर्ण केले नाही. 1995 चा जी.आर. तरे साहेबांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आला व यामुळेच आदिवासी कोळी जमातीमधील नोकरदारांना न्याय मिळणेसाठीचा मार्ग मोकळा झाला होता. यावरुनच समाजबांधवांसाठीची तरे साहेबांची तळमळ दिसुन येत होती. परंतु त्यांचे समाजाच्या विकासासाठीच्या प्रयत्नांना शिवसेना सत्तेत आली तरी यशस्वी होऊ दिले नाही. त्यांना विधानसभेचे तिकीट सुध्दा नाकारले. एकुणच शिवसेनेने त्यांचा व समाजाचा फक्त आपल्या फायद्यासाठी वापर केला पण अखेरपर्यंत त्यांना राजाश्रय मिळु दिला नाही. याकडे आपल्या समाजातील तरुण पिढीनं दुर्लक्ष करुन चालणार नाही. समाजाचे प्रलंबित प्रश्न ठाकरे सरकारने सोडवावे तरच स्व. तरे साहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल. असे स्पष्ट मत यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना गणेश अंकुशराव यांनी मांडले.
आज तरे साहेब हयात नसले तरी त्यांच्या कार्याच्या रुपाने ते आपल्या प्रत्येकाच्या मनामनात जिवंत आहेत. त्यांची अधुरी स्वप्नं साकारण्याचं काम आता आम्ही हातात घेऊ आणि समाजहितासाठी तरे साहेबांच्या विचारांची अखंड ज्योत सतत तेवत ठेवु. अशी भावनाही यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली.
यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी, अंबादास कोळी, नागेश बिराजदार, लक्ष्मण धनवडे, विक्रम शिरसट, पांडुरंग सावतराव, संजीवकुमार कोळी, गणेश कोळी, संजय बोयणे, विष्णुनाथ कोळी, हणुमंत मोतीबने, कपिल कोळी, सिध्देश्वर कोळी, अनुसया सुधावळे, पंढरीनाथ कोणे सर, निलेश माने, प्रकाश मगर, सुनील म्हेत्रे, बाबासाहेब अभंगराव, पुंडलिक परचंडे, जालिंदर करकमकर, सुनील कोरे, राजाराम कोळी, सुरज कांबळे, गणेश तारापुरकर आदींसह आदिवासी महादेव कोळी जमातीचे अनेक समाजबांधव उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…