पंढरपूर शहरातील लोकमान्य विद्यालयामध्ये अनेक चुकीच्या पध्दतीने शैक्षणिक पात्रता नसलेले केवळ राजकीय दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून तिथे अनेक शिक्षक व मुख्याध्यापक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर काही शिक्षिका या नगरसेवक यांच्या पत्नी असून त्यांनी घटस्फोटाचे करण दाखवून केवळ नोकरी मिळविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक शिक्षक व मुख्याध्यापक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.तरी दोषी शिक्षकांवर कारवाई करून गरजवंत असणाऱ्यांना शिक्षक म्हणून नोकरी द्यावी. वरील सर्व गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी व गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. यावर ना.बच्चू कडू यांनी तात्काळ आदेश देवून मा.अ.मु.स. (शालेय शिक्षण) यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
या निवेदनात असे म्हटले आहे की, लोकमान्य विद्यालयात अनेक शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक करून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आलेली आहे. तसेच एका शिक्षिकेने न्यायालयात घटस्फोट घेतल्याचे कारण दाखवून नोकरी पदरात पाडून घेतली आहे. यामुळे न्यायालयाची, जनतेची व विद्यार्थ्यांची फसवणूक करून नोकरी मिळवली आहे. तर काही शिक्षकांनी शासनाचा पगार 70 ते 80 हजार रूपये घेवून त्या ठिकाणी 7 ते 8 हजार रूपयांवर बदली शिक्षक ठेवलेले आहे. मुख्याध्यापक यांनी आठवड्यातून 6 तास तरी विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे असे बंधनकारक असताना गेली 2 ते 3 वर्षापासून मुख्याध्यापक हे एकदा ही शाळेत आलेले नाहीत तरी त्यांची हजेरी पटाला सही होते हेच नवल वाटते. तरी हे प्रकरण फार गंभीर असून तरी या अनाधुंद कारभाराची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून शासनाची फसवणूक करून चाललेल्या गैरकारभाराचा अहवाल मागवून जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे.