*समृध्दी ट्रॅक्टर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त केला अनोखा उपक्रम*
स्त्री शक्तीचा कर्तुत्वाचा गौरव, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समृद्धी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून एकूण ३३ कुटुंबातील महिलांना रुपये ११,०००ची FD करून देण्यात आली असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
समाजात प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आज प्रत्येक कुटुंबातील स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने हा लहानसा उपक्रम समृद्धी ट्रॅक्टर यांनी हाती घेतला.
त्यावेळी सांगोल्याच्या श्रीमती सिंधुताई बाळासाहेब माने, करकंबच्या श्रीमती वृषालीताई दिलीप खारे, कडलासच्या श्रीमती प्रियांकाताई गणपती जाधव, श्रीमती बाकाबाई धुरा सरक, चिखलगीच्या श्रीमती अश्विनी गुदलिंगप्पा उमराने, बलवाडीच्या श्रीमती पूजा सोमनाथ पालसंडे या महिलांना FD करून देण्यात आली.
यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, समृद्धी ट्रॅक्टरचे अभिजीत कदम, मॅनेजर सोमनाथ केसकर, नंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…