देशभरात सद्या विविध आरक्षणांचा मुद्दा गाजत आहे. राज्यात देखील मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. अशातच, शुक्रवारी झालेल्या एका खटल्यात महत्वपूर्ण निकाल दिला आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यानं खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेले गुण मिळवल्यास त्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश देण्यात यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
यामुळे, आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेताना राखीव गटांच्या जागांमध्ये देखील मोठी चुरस निर्माण झालेली असते. उच्च गुण मिळालेल्या विद्यार्थ्याने आरक्षित गटातून प्रवेश घेतल्यास दुसऱ्या गरजू विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही. आता न्यायालयाच्या या निकालानुसार उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश दिला जाईल.
मात्र, यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांना अधिक संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनं त्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणांपेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्यांची निवड खुल्या प्रवर्गासाठी व्हावी, असं म्हटलं. खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणांएवढे गुण राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यानं मिळवल्यास त्याला खुल्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…