पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने देखील एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःचा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये पत्नीच्या आत्महत्येस देखील पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यालाच जबाबदार धरले असून, सोबत सासरकडील मंडळी देखील माझ्या जिवावर उठली असल्याचा आरोप त्याने व्हिडीओमध्ये केला आहे. सदर व्हिडिओमध्ये तो आत्महत्या करणार असल्याचं बोलत असून, त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी शेअर केलेला व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, आत्महत्या करण्याचे कारण की हरिभाऊ कोळेकर यांनी माझा हसता खेळता परिवार उध्वस्त केला आहे. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर माझ्या पत्नीने आत्महत्या केली. “हरिभाऊ कोळेकर म्हणतो की माझे खूप दूर पर्यंत संबंध आहेत मी या प्रकरणातून सहज बाहेर पडेन” त्याला फाशी झालीच पाहिजे असेदेखील त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…