न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कामशेत येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने शनिवारी (दि. 6) दुपारी 3.25 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर असे ‘एसीबी’ने कारवाई केलेल्या तिघांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रारदार हे मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार दिली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवित्री संस्थेतील बनावट मतदार यादीत फसवणूक केल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना 21 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. बाळासाहेब नेवाळे यांना वडगाव मावळ न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
वडगाव मावळ न्यायालयात जामीनाबाबत मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी अडीच लाख रुपये पोलिसांना दिले. 25 फेब्रुवारी रोजी न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी काहीच मदत केली नाही. नेवाळे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.बाळासाहेब नेवाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर यांनी काहीच मदत न केल्याने त्यांना उर्वरित रक्कम देण्याचे टाळले असता नेवाळे यांचा 10 मार्च रोजी जामीन असल्याने मदत करतो, असे म्हणून उर्वरित अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली जात होती.
तक्रारदार दत्तात्रय शेवाळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दिली. शनिवारी (दि. 6) रोख रक्कम एक लाख रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना अटक केली. त्यांची पाच तास चौकशी सुरू आहे. आरोपींवर कामशेत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजेंद्र बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील क्षीरसागर, सुनील भिले, कर्मचारी वैभव गिरीगोसावी, रतेश थरकर, किरण चिमटे या पथकाने सापळा रचून कारवाई केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…