ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 190 नागरिकांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल

पंढरपूर तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

190 नागरिकांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल

 

  पंढरपूर, दि. 04 :- सोलापूर जिल्ह्यांत शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 190 नागरिकांकडून  19 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्ग वाढू नये यासाठी  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी  तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच विविध निर्बंधही घातले आहेत. तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध शासकीय कामाकाजासाठी तहसिल कार्यालय, पंचायत समितीमध्ये येतात. गर्दीमुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी  नायब तहसिलदार मनोज श्रोत्री व  पंडीत कोळी यांनी पथक तयार करुन विना मास्क तहसिल कार्यालय आवारात  फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. संबधित नागरिकांकडून दिनांक 27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत 9 हजार रुपये दंड वसून करण्यात आला. ग्रामीण भागात विना मास्क  फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन  5 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच भंडीशेगांव, उपरी व गादेगांव या ठिकाणी तहसिलदार सुशिल बेल्हेकर व गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी अचानक भेट देवून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 5 हजार रुपयांचा दंड वसून केला. असा एकूण 19  हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले. 

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, विना कारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच कोरोनाबाबत प्रशासनाने वेळोवळी दिले सूचनांचेही पालन करावे अन्यथा साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल असे आवाहनही तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago