ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर शिवसेना विस्तार कार्यकारिणी जाहीर   नवीन चेहर्‍यांना व तरुणांना दिली शिवसेनेने संधी…. पंढरपूर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर संघटक पदी गणेश घोडके

पंढरपूर शहर शिवसेना विस्तार कार्यकारिणी जाहीर
नवीन चेहर्‍यांना व तरुणांना दिली शिवसेनेने संधी….
पंढरपूर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर संघटक पदी गणेश घोडके
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात शिवसेना वाढीसाठी आज शहर कार्यकारणीचा विस्तार करत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पंढरपूर शहरातील प्रत्येक  घराघरात शिवसेना पोहोचवण्या साठी तसेच येणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्य घराघरात रुजवण्यासाठी आज मान्यवरांच्या उपस्थितीत विस्तार कार्यकारणी जाहीर करण्यात आली शहराध्यक्ष रवी मुळे यांनी पंढरपूर शहराच्या कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्य करणारे व विविध पक्षसंघटना मध्ये काम करून आपला ठसा उमटविणारे अनिल कसबे यांची निवड जाहीर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे हे होते यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक साईनाथ भाऊ अभंगराव, जयवंतराव माने, सिद्धू कोरे, नागेश कदम, विनोद कदम,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,काका बुराडे आदि मान्यवर उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी मध्ये  पंढरपूर शिवसेना शहर संघटक पदी गणेश घोडके तर सचिव कैलास लोकरे यांची निवड करण्यात आली प्रसिद्धीप्रमुख अमित गायकवाड व विभाग प्रमुख राघवेंद्र
ऐनापुरे यांची निवड करून वरील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेचा पंचा घालत त्यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना नूतन कार्याध्यक्ष अनिल कसबे म्हणाले की पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवून शिवसेनेच्या कार्याची माहिती देणार आहे त्याचबरोबर तळागळातील  सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच शिवसेनेच्या विचारातून पदाला योग्य न्याय देऊ असे मत व्यक्त केले. याप्रसंगी नूतन महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये महिला उपशहर प्रमुख मध्ये सौ.रामेश्वरीताई घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सौ.कल्पनाताई वाघमारे व सौ.दहिहंडे यांनी पक्ष प्रवेश केला कार्यक्रमासाठी पंढरपूर शहर शिवसैनिक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago