माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी तरतूद मंजूर

राज्यातील २०वर्षांपासून विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकांना २०टक्के  व पाच पासून फक्त २०टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील टप्पा अनुदान देण्यासाठी  ४०४ कोटी निधीची आवश्यकता होती सदर खर्च चालू आर्थिक वर्षाच्या अनुदानातून देने शक्य असल्याने त्यासाठी लाक्षणिक  पुरवणी मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर झाली असल्याची माहिती मा आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.सातत्याने तपासण्याहून होऊन ही अनुदान मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता, राज्यातील ४१३१ प्राथमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक तसेच १७२९९माध्यमिक शाळा, तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २०टक्के अनुदान देण्यासाठी २६३कोटी  निधीची आवश्यकता होती. सदर खर्च चालू आर्थिक वर्षाच्या अनुदानातून भागविणे शक्य असल्याने त्यासाठी तीन हजार रुपये ची लक्षणीय तरतूद पुरवणी मागणीव्दारे करण्यात आली प्राथमिक शाळेतील १६८८ शिक्षकांना २०टक्के प्रमाणे अनुदान देण्यासाठी  २०कोटी निधी आवशकता होती, तर उच्च माध्यमिक शाळेतील ८८२० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २०टक्के प्रमाणे अनुदान देण्यासाठी १२०कोटींची आवश्यकता होती सदर खर्च चालू आर्थिक वर्षाच्या अनुदानातून देने शक्य असल्याने त्यासाठी एक हजार रुपये ची लाक्षणिक तरतूद पुरवणी मागणी व्दारे करण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून मिळणार पगार

राज्यातील २१४३० शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर पासून वाढीव २०टक्के तर  १०४८८ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर पासून २०टक्के प्रमाणे वेतन मिळणार आहे.त्यासाठी लवकरच शासन आदेश निर्गमित होईल अशी माहिती मा आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.

अघोषित ही घोषित होणे आवश्यक

२०१२-१३च्या नैसर्गिक वाढीच्या तुकड्या तसेच किरकोळ त्रुटीमुळे अद्याप पात्र घोषित न झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शाखा, तुकड्या घोषित करून त्यांनाही अनुदान देने गरजेचे होते, त्यांच्या याद्या अनुदानासह घोषित करण्यात याव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

विकास शिंदे ,सचिव, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती सोलापूर

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago