बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच कोटी घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे ते काही बोलणार नाहीत. असा आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला होता. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी तर असं देखील म्हटलं की, शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत.
आजही विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा मुद्दा चर्चेत राहिला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकऱणी सर्व पुरावे हाती असतानाही आणि या प्रकरणाला 20 दिवस उलटूनही अजून एफआयआर का दाखल झाली नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. 12 ऑडिओ क्ल्पिमध्ये थेट पुरावे असूनही पोलीस का काम करत नाही असा सवालही त्यांनी यावेळी सभागृहासमोर उपस्थित केला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…