ताज्याघडामोडी

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करा प्रांताधिकारी गुरव यांच्या सूचना

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करा

प्रांताधिकारी गुरव यांच्या सूचना

              पंढरपूर, दि. 02 :-  जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढवा अशा सूचना प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

            कोरोना आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकरस अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत भस्मे यांच्यासह शासकीय व खाजगी  रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी प्रांताधिकारी गुरव बोलताना म्हणाले,  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय समिती तसेच शहरी भागातील वार्डस्तरीय समितीने विशेष मोहिम राबवून रुग्णांचा शोध घ्यावा तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून तात्काळ तपासणी करुन उपचार सुरु करावेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किमान 20 पेक्षा जास्त व्हायला हवे. तसेच खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती घ्यावी घेवून त्यामध्ये काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ तपासणी करावी. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. तसेच खाजगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत रुग्णासाठी बेड उपलब्ध ठेवावेत. विनामास्क फिरणा-या नागरिकांवर प्रभावीपणे कारवाई करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी  यावेळी दिल्या.

            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व शासनाच्या नियमांचे पालन करावे. जे नागरिक नियमांचे उल्लघंन करतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले. शहरासह ग्रामीणभागात कोरोना संसर्ग  वाढत असल्याने ग्रामीण भागात रुग्णांचा शोध घेण्यासाठी ग्रामस्तरीय समितीमार्फत विशेष शोध मोहिम राबविण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी चाचणी केंद्रही सुरु करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी सांगितले.

            तालुक्यात शहरी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढुनये यासाठी  स्ट्रेसिंग, टेस्टींग उपचार यावर भर देण्यात येणार आहे.तसेच घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार असून  नागरिकांनी कोणताही आजार लपवू नये घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला खरी माहिती द्या जेणेकरुन लक्षणे असणाऱ्या नागरिकांवर तात्काळ उपचार करता येतील. तसेच कोरोनाची लक्षणे  असणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याचे  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बोधले यांनी सांगितले.

     कोरोनाबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे पोलीस निरिक्षक किरण अवचर यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड, सामाजिक अंतराचे पालन न केल्यास 100 रुपये दंड व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास  200 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 days ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

3 weeks ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

3 weeks ago

पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?

वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…

3 weeks ago

विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक संघाचे उल्लेखनीय यश

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…

3 weeks ago