65 एकर येथील कोविड केअर सेंटरची
प्रांताधिकारी यांनी केली पाहणी
पंढरपूर, दि. 02 :- तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 65 एकर येथील कोविड केअर सेंटरच्या सुविधांची प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट देवून पाहणी केली.
कोविड केअर सेंटर येथे रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती प्रांताधिकारी गुरव यांनी घेतली तसेच. तेथील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी यांच्याशी आवश्यक सुविधा, औषध साठा आदी बाबत माहिती घेवून संवाद साधला. तसेच दाखल कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून शंकाचे निरसन केले. तसेच रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधेबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासमवेत तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकरस अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम उपस्थित होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…